________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
ल
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
१५६ तद्ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकाङ्क्षितम् । करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ।। २ ।१८।३०
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
( राम म्हणतो ) देवि ( कैकेयि, ) राजाच्या मनांत जो कांहीं अभिप्राय असेल, तो सांग. राम कधींही ( परस्परविरुद्ध ) दोनदां बोलत नसतो.
१५७ तन्मे दहति गात्राणि विष पीतमिवाशये ।
हा नाथेति प्रिया सा मां ह्रियमाणा यदब्रवीत् || ६ |५/७
यच्च दानं प्रयच्छति ।
३३
( राम लक्ष्मणाला म्हणतो ) उदरामध्यें विष घेतलें असतां तें ज्याप्रमाणें गात्रं दग्ध करून टाकितें, त्याप्रमाणें रावण हरण करून नेत असतांना 'हे नाथ' असें जें ती सीता मला उद्देशून म्हणाली तें म्हणणें माझीं गात्रें दग्ध करीत आहे.
१५८ तपते यजते चैव
क्रोधेन सर्वं हरति
तस्मात्क्रोधं विसर्जयेत् ॥ ७७५९ प्र. २।२२
मनुष्य जें कांहीं तप करितो, यजन करितो, अथवा दान देतो, त्या सर्वांचा क्रोध नाश करितो; म्हणून क्रोधाचा त्याग करावा. १५९ तपो हि परमं श्रेयः संमोहमितरत्सुखम् ॥ ७१८४/९
तप हैं परम कल्याण करणारें आहे; इतर सुख मोह पाडणारें आहे. १६० तीक्ष्णकामास्तु गन्धर्वास्तीक्ष्णकोपा भुजंगमाः ।
मृगाणां तु भयं तीक्ष्णं ततस्तीक्ष्णक्षुधा वयम् ||४|५९।९ ( गृधराज संपाति वानरांना म्हणतो ) ज्याप्रमाणें गंधर्वांची कामवासना तीक्ष्ण असते, सर्पाचा क्रोध तीक्ष्ण असतो आणि मृगांचें भय तीक्ष्ण असतें त्याप्रमाणें आम्हां गृध्रपक्ष्यांची क्षुधा तीक्ष्ण असते. रा. सु. ३
For Private And Personal Use Only