________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
. १३ ७१ अब्रुवन्कस्यचिनिन्दामात्मपूजामवर्णयन् ।
न कश्चिद्गुणसंपन्नः प्रकाशो भुवि दृश्यते ॥ ३२०७५० कोणाचीहि निंदा न करतां व आत्मस्तुति न करता कोणताहि गुणसंपन्न पुरुष जगांत प्रसिद्धीस येत असल्याचे दृष्टीस पडत नाही. ७२ अभिमानकृतं कर्म नैतत्फलवदुच्यते।
त्यागयुक्तं महाराज सर्वमेव महाफलम् ॥ १२।१२।१६ ( नकुल युधिष्ठिराला म्हणाला ) [ मी कर्ता अशा ] अभिमानाने केलेले कर्म सफल झाले असे म्हणता येत नाही. त्यागबुद्धीने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ फार मोठे मिळतें. ७३ अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः ।
चत्वारि संप्रवर्धन्ते कीर्तिरायुर्यशो बलम् ।। ५।३९।७६ नेहमी वृद्धजनांना वंदन करून त्यांच्या समागमांत जो राहतो, त्याची कीर्ति, आयुष्य, यश व सामर्थ्य ही चार वृद्धिंगत होतात. ७४ अभिशस्तं प्रपश्यन्ति दरिद्रं पार्श्वतः स्थितम् ।
दारिद्रयं पातकं लोके न तच्छसितुमर्हति ॥१२।८।१४ दरिद्री मनुष्य जवळ उभा राहिला तर एकाद्या पातकी मनुष्याप्रमाणे लोक त्याजकडे पाहतात. या लोकामध्ये दारिद्य हे एक पातकच आहे ! म्हणूनच त्याची प्रशंसा करणे योग्य नाही. ७५ अभ्यावहति कल्याणं विविधं वाक्सुभाषिता ।
सैव दुर्भाषिता राजननायोपपद्यते ॥ ५।३४७७ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, वाणीने चागले भाषण केले असता त्यापासून अनेक प्रकारे कल्याण होते, परंतु, दुर्भाषण केले असतां तीच वाणी अनर्थाला कारण होते.
For Private And Personal Use Only