________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२१
९८ कच्चिन्न सर्वे कर्मान्ताः प्रत्यक्षास्तेऽविशङ्कया।
सर्वे वा पुनरुत्सृष्टा मध्यमेवात्र कारणम् ॥२।१००५२ ( राम भरताला विचारतो) तुझे सर्व चाकर निर्भयपणे तुझ्या दृष्टीसमोर येत नाहीत ना? किंवा त्या सर्वांना तूं बंदी केली नाहींस ना ? अशा संबंधांत (राजाने) मध्यम मार्ग धरिलेला बरा. ९९ कचिनिद्रावशं नैपि कच्चित्कालेऽवबुध्यसे ।
कचिच्चापररात्रेषु चिन्तयस्यर्थनैपुणम् ॥ २१००।१७ तूं निद्रावश होत नाहीस ना? तूं योग्य काली जागृत होतोस ना? द्रव्यप्राप्ति कोणत्या उपायाने होईल, याचे चिंतन उत्तररात्रीं करितोस ना? १०० कञ्चिन्मन्त्रयसे नैकः कञ्चिन्न बहुभिः सह ।
कच्चित्ते मन्त्रितो मन्त्रो राष्ट्र न परिधावति ॥२॥१००१८ (राम भरताला विचारतो ) तूं आपल्या स्वतःशीच एकटा अथवा पुष्कळ मंडळीशी मसलत करीत नाहीस ना ? तूं ठरविलेली मसलत अमलांत येण्यापूर्वीच राष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत नाही ना ? १०१ कथं राजा स्थितो धर्मे परदारान्परामृशेत् ॥ ३५०१६
(प्रजापालनरूप) धर्माचे ठिकाणी स्थित असणारा राजा परस्त्रीला कसा बरें स्पर्श करील ? १०२ कन्यापितृत्वं दुःखं हि सर्वेषां मानकाङ्क्षिणाम् ॥७९।१०
सर्व मानी मनुष्यांना पोटीं कन्या येणे म्हणजे खरोखर दुःख होय. १०३ कर्णवन्ति हि भूतानि विशेषेण तुरङ्गमाः।
यूयं तस्मानिवर्तध्वं याचनां प्रतिवेदिताः।। २।४५/१५ ( राम रथांत बसून अरण्यांत जाऊ लागला असतां, द्विजमंडळी रथाच्या घोड्यांना 'तुम्ही परत फिरा' असे म्हणतात) प्राण्यांना कान आहेत, विशेषेकरून अश्वांचे कान तर आधिक तिखट आहेत. म्हणून हे अश्वांनो, आमच्या याचनेकडे लक्ष देऊन तुम्ही परत फिरा. ( बहिन्यांसारखे पुढे जाऊ नका.)
For Private And Personal Use Only