________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ११ ६० अन्यो हि नानाति कृतं हि कर्म
मनुष्यलोके मनुजस्य कश्चित् । यत्तेन किंचिद्धि कृतं हि कर्म
तदनुते नास्ति कृतस्य नाशः ॥३॥२०७।२७ मृत्युलोकी एका मनुष्याने केलेल्या कर्माचे फळ दुसरा कोणीहि भोगीत नाही. त्याने जे काही केले असेल त्याचे फळ त्याला भोगावेच लागते. केलेल्याचा नाश केव्हांहि होत नाही.
६१ आप च ज्ञानसंपन्नः सर्वान्वेदान्पितुगृहे । __ श्लाघमान इवाधीयाद्ग्राम्य इत्येव तं विदुः॥१३॥३६॥१५ बापाच्या घरी राहून मोठ्या ऐटीत सर्व वेदांचा अभ्यास करून जरी कोणी. ज्ञानसंपन्न झाला तरी लोक त्याला खेडवळच म्हणणार. ६२ अपि चेत्सुदराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः॥६॥३३॥३० [श्रीकृष्ण सांगतात ] अत्यंत दुराचारी असलेला मनुष्यहि जर अनन्यभावाने मला भजेल तर तो साधुच समजावा. कारण [ तो मला भजू लागला म्हणजे ] त्याचा निश्चय चांगला झाला. ( तो चांगल्या मार्गाला लागला.)
६३ अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः । __ सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥६।२८।३६ (श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) सर्व पापी लोकांहुन तूं जरी अधिक पापी असलास तरी ज्ञानरूप नौकेच्या योगानेच तूं सर्व पापसमुद्र तरून जाशील.
६४ अपि पापकृतो रौद्राः सत्यं कृत्वा पृथक्पृथक् । -- अद्रोहमविसंवादं प्रवर्तन्ते तदाश्रयाः ॥१२॥२५९।११ पाप करणारी आणि भयंकर अशी जरी मनुष्ये असली, तरी ती सुद्धां परस्परांशी सत्याने वागण्याची शपथ घेऊन त्या सत्याच्या आधारानें, परस्परांशी विश्वासघात व फसवणूक न करितां वागतात.
For Private And Personal Use Only