________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४७ असृजद्भगवान्पक्षौ द्वावेव हि पितामहः ।
सुराणामसुराणां च धर्माधर्मों तदाश्रयौ ॥६।३५।१३ ऐश्वर्यसंपन्न अशा पितामहाने-ब्रह्मदेवानें-देव आणि असुर असे दोन पक्ष निर्माण केले, आणि त्यांच्या ठिकाणी अनुक्रमें धर्म व अधर्म उत्पन्न केले. ४८ अस्मिञ्जीवति वीरे तु हतमप्यहतं बलम् ।
हनूमत्युज्झितप्राणे जीवन्तोऽपि मृता वयम् ॥६७४।२२ (मारुति जिवंत आहे काय, असा जांबवानाने बिभीषणाला प्रश्न केला असतां बिभीषणाने विचारले की, मारुतीबद्दलच प्रश्न कां विचारला यावर जांबवान् बिभीषणाला सांगतो) हा वीर हनुमान जिवंत असतां सैन्य मारले गेले, तरी तें न मारिल्यासारखे आहे, आणि हा मेला असतां आम्ही जिवंत असूनही मेल्यासारखे आहों. ४९ अस्वाधीनं कथं दैवं प्रकारैरभिराध्यते ।
स्वाधीनं समतिक्रम्य मातरं पितरं गुरुम् ।।२।३०१३३ (राम सीतेला म्हणतो) माता, पिता व गुरु ही आपल्या हातची दैवते टाकून देऊन स्वाधीन नसलेल्या दुसऱ्या दैवताची नाना प्रकारांनी आराधना, करावी तरी कशी ? ५० अहं हि वचनाद्राज्ञः पतेयमपि पावके ॥ २॥१८।२८
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे । नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च ॥ २।१८।२९. ( राम कैकेयीला म्हणतो) मी राजाच्या सांगण्यावरून अग्नीत देखील पडेन. हितकर्ता गुरु, माझा बाप (दशरथ) राजा, याने आज्ञा केली असतां, मी तीक्ष्ण विषाचे भक्षण करीन, किंवा समुद्रांतही उडी घेईन.
For Private And Personal Use Only