________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
namamannaannn
३४ अर्थ वा यदि वा कामं शिष्टाः शास्त्रेष्वनागतम् ।
व्यवस्यन्त्यनुराजानं धर्म पौलस्त्यनन्दन ॥ ३॥५०१९ (जटायु म्हणतो) हे रावणा, शास्त्रामध्ये ज्याचा नीट बोध होत नाही असा धर्म, अर्थ, अथवा काम राजाचंच आचरण पाहून शिष्ट लोक निश्चित करीत असतात. ३५ अर्थानान्तरे बुद्धिनिश्चितापि न शोभते ।
घातयन्तीह कार्याणि दूताः पण्डितमानिनः॥५।२।३८ ( लंका अवलोकन केल्यानंतर मारुतीचे स्वगत विचार ) कार्याकार्याविषयीं स्वामीनें मंत्र्यासहवर्तमान जरी एखादा विचार निश्चित केला असला, तरी अयोग्य दूताशीं गांठ पडल्यावर त्या विचारापासून काहीएक निष्पन्न होत नाही. कारण, शहाणपणाच्या घमेंडींत असणारे दूत स्वामिकार्याचा घात करितात. ३६ अर्थिनः कार्यनित्तिमकर्तुरपि यश्चरेत् ।
तस्य स्यात्सफलं जन्म किं पुनः पूर्वकारिणः॥४।४३७ ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केला नाही, अशा अर्थिजनाची (याचकाची ) कार्यसिद्धि केल्याने जीवित सफल होईल; मग ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केले आहेत, त्याचे कार्य केल्याने तें जीवित सफल होईलच, हे कशाला सांगितले पाहिजे ? ३७ अर्थिनामुपपन्नानां पूर्वं चाप्युपकारिणाम् । __ आशां संश्रुत्य यो हन्ति स लोके पुरुषाधमः॥४।३०।७१ पूर्वी ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत, अशा याचकांना त्यांच्या कार्यसिद्धीच्या कामी वचन देऊन जो कार्यहानि करितो, तो पुरुष लोकांमध्ये अधम होय.
For Private And Personal Use Only