________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९२५ श्रीमान्स यावद्भवति तावद्भवति पूरुषः ॥ ५॥७२॥३६
कोणीहि संपत्तीने युक्त असेल तोपर्यंतच खरोखर पुरुष गणला जातो. ९२६ श्रीहता पुरुषं हन्ति पुरुषस्याधनं वधः ॥५/७२।१९
लक्ष्मीचा घात झाला असतां पुरुषाचा वध होतो. कारण, निर्धनता हा पुरुषाचा वधच होय. ९२७ श्रुतमामोति हि नरः सततं वृद्धसेवया ॥१३॥१६२१४९ ___ सतत वृद्धजनांचा समागम केल्याने मनुष्य बहुश्रुत होतो. ९२८ श्रुतं प्रज्ञानुगं यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा। ____ असंभिन्नार्यमर्यादः पण्डिताख्यां लभेत सः ५।३३।२९
बुद्धीला अनुरूप ज्याचें अध्ययन आहे, अध्ययनाला अनुरूप ज्याचे विचार आहेत, आणि आर्य पुरुषाच्या मर्यादेचें ज्याच्या हातून उल्लंघन होत नाही त्याला पंडित ही संज्ञा प्राप्त होते. ९२९ श्रुतेन तपसा वापि
श्रिया वा विक्रमेण वा। जनान्योऽभिभवत्यन्यान्
कर्मणा हि स वै पुमान् ॥ ५॥१३३१२५ विद्ये किंवा तपाने, संपत्तीने किंवा पराक्रमाने जो इतरांवर मात करतो, तो आपल्या कर्तृत्वामुळे खरा पुरुष ठरतो. ९३० श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ६२७३५ [श्रीकृष्ण सांगतात ] आचरण्यास सोपा अशा परधर्मापेक्षा, सदोष असला तरीहि स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मात राहून मरण आले तरी बेहेत्तर. ( कारण ), परधर्माचा स्वीकार करण्यांत मोठे भय आहे. ९३१ श्रेष्ठो हि पण्डितः शत्रुर्न च मित्रमपण्डितः ॥१२।१३८।४६
शहाणा शत्रु पत्करला, पण मूर्ख मित्र नको.
For Private And Personal Use Only