SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 133
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ७६५ यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ।।६।४०।२३ शास्त्रांत सांगितलेला विधि सोडून जो स्वेच्छाचाराने वागतो, त्याला सिद्धि प्राप्त होत नाही, आणि श्रेष्ठ गतिहि नाही. ७६६ यस्तु निःश्रेयसं श्रुत्वा प्राक्तदेवाभिपद्यते । आत्मनो मतमुत्सृज्य स लोके सुखमेधते ॥५॥१२४।२४ आपलें खरें कल्याण कशांत आहे हे ऐकल्यावर, स्वतःचे मत बाजूला सारून, जो प्रथमतः त्याचेच आचरण करतो त्याला जगांत सुख होतें. ७६७ यस्तु वृद्धया न तृप्येत क्षये दीनतरो भवेत् । एतदुत्तममित्रस्य निमित्तमिति चक्षते ॥ १२॥८०१६ अभ्युदय कितीही झाला तरी तृप्ति न होणे, आणि हानि झाल्यास अत्यंत दीन. होणे हे उत्तम प्रतीच्या मित्राचे लक्षण होय असे सांगितलेले आहे. ७६८ यस्माददान्तान्दमयत्यशिष्टान् दण्डयत्यपि । दमनाद्दण्डनाच्चैव तस्माद्दण्डं विबुधाः ॥ १२॥१५/८ ज्याअर्थी [राजदंड हा] स्वैराचरण करणाऱ्यांना वठणीस आणतो आणि असभ्यपणे वागणारांना शिक्षा करतो, त्याअर्थी दमन करणे आणि दंड करणे या दोन गुणांमुळे ज्ञाते लोक त्याला दंड असें म्हणतात. ७६९ यस्मिन्क्षमा च क्रोधश्च दानादाने भयाभये । निग्रहानुग्रहौ चोभौ स वै धर्मविदुच्यते ॥ १२।१४।१७ ज्याच्या ठायीं [प्रसंगानुरूप ] क्षमा व क्रोध, दान व ग्रहण, भय व अभय, तसेच निग्रह व अनुग्रह ही दोनहि आढळतात तोच खरोखर धर्म जाणणारा होय. ७७० यस्मिन्नर्थे हितं यत्स्यात्तद्वर्ण रूपमादिशेत् । बहुरूपस्य राज्ञो हि सूक्ष्मोऽप्यर्थो न सीदति ॥१२॥१२०१६ ज्या बाबतीत जे योग्य दिसेल त्याप्रकारचे रूप [ राजानें ] धारण करावे. कारण [प्रसंगाप्रमाणे ] निरनिराळी रूपें धारण करणाऱ्या राजाची बारीकसारीक गोष्टीत सुद्धा फसगत होत नाही. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy