________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७४२ यदन्यविहितं नेच्छेदात्मनः कर्म पूरुषः ।
न तत्परेषु कुर्वीत जाननप्रियमात्मनः ॥ १२।२५९।२० जे दुसऱ्यांनी आपल्यासंबंधाने करूं नये असें मनुष्याला वाटते, ते आपल्याला अप्रिय आहे, हे लक्षांत वागवून, त्यानेंहि दुसऱ्यासंबंधाने तसे करूं नये ७४३ यदर्थो हि नरोराजस्तदर्थोऽस्यातिथिः स्मृतः ॥१५।२६।३७
(धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणतो ) राजा, अतिथि कितीहि योग्यतेचा असला तरी, तो ज्याचा अतिथि असेल त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याने झाले पाहिजे असा नियमच आहे. ७४४ यदा तु कश्चिज्ज्ञातीनां बाह्यः प्रार्थयते कुलम् ।
न मर्षयन्ति तत्सन्तो बाह्येनाभिप्रधर्षणम् ॥ ३२४३३३ जेव्हां कोणी परका मनुष्य भाऊबंदांच्या कुळावर उठतो, तेव्हां परक्याकडून आपल्या कुळाचा होत असलेला तो अपमान सज्जन सहन करीत नाहीत. ७४५ यदा मानं लभते माननाई
स्तदा स वै जीवति जीवलोके । यदावमानं लभते महान्तं
तदा जीवन्मृत इत्युच्यते सः ॥ ८६९/८१ सन्मान्य पुरुष जोपर्यंत मान मिळवितो, तोपर्यंतच या जगांत तो जिवंत असतो. एकदा त्याचा अतिशय अपमान झाला की, तो जिवंत असूनहि मेल्याप्रमाणेच झाला ! ७४६ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । ____ अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ६।२८१७
[ भगवान् श्रीकृष्ण सांगतात. ] अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानि येते व अधर्माचा उत्कर्ष होतो त्या त्या वेळी मी (भगवान् श्रीकृष्ण ) अवतार घेत असतो. ७४७ यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६।२६।५८ कासव जसे आपले सर्व अवयव आंत ओढून घेते त्याप्रमाणे जेव्हां मनुष्य आपली सर्व इंद्रिये त्यांच्या त्यांच्या विषयांपासून आंवरून धरतो, तेव्हांच त्याची बुद्धि स्थिर झाली असे म्हणतात.
For Private And Personal Use Only