________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
६९२ मूलमेवादितच्छिन्द्यात्परपक्षस्य नित्यशः ।
ततः सहायांस्तत्पक्षान्सर्वाश्च तदनन्तरम् ।। १।१४०।१६
नेहमी आपल्या शत्रुपक्षाचें मूळच पहिल्याने तोडून टाकावें. नंतर त्याचे साथीदार व त्यानंतर त्याच्या पक्षांतील इतर सर्व लोक यांचा उच्छेद करावा. ६९३ मृतं वा यदि वा नष्टं योऽतीतमनुशोचति ।
दुःखेन लभते दुःखं द्वावनर्थों प्रपद्यते ।। ११।२६।४
१११
मेल्यामुळे किंवा हरवल्यामुळे जें नाहींसें झालें, त्याविषयीं जो शोक करीत बसतो, त्याला त्या दुःख करण्यापासून पुनः दुःख प्राप्त होतें, व अशा रीतीनें तो दोन अर्थात सांपडतो.
६९४ मृतं शरीरमुत्सृज्य काष्ठलेोष्टसमं जनाः ।
मुहूर्तमिव रोदित्वा ततो यान्ति पराङ्मुखाः।। १३।१११।१४ मेलेलें शरीर लाकडाप्रमाणे अथवा मातीच्या ढेकळाप्रमाणे फेंकून देऊन व क्षणभर रडून नंतर लोक पाठमोरे होऊन निघून जातात.
६९५ मृतकल्पा हि रोगिणः ।। ५३६/६७
रोगी मनुष्यें मेल्यांतच जमा.
६९६ मृतो दरिद्रः पुरुषः || ३।३१३।८४ दरिद्री पुरुष जिवंतपणीच मेलेला असतो.
६९७ मृदुं वै मन्यते पापो भाषमाणमशक्तिकम् ।
जितमर्थं विजानीयादबुधो मार्दवे सति || ५|४|६
कोणी सौम्यपगे बोलूं लागला तर दुष्ट लोक त्याला दुर्बळ समजतात. सौम्यपणा असला म्हणजे मूर्खाला वाटावयाचें कीं आपला पक्ष सिद्ध झाला.
६९८ मृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम् ।
नासाध्यं मृदुना किंचित्तस्मात्तीव्रतरं मृदु || ३ |२८|३१ मृदुपणानें भयंकर शत्रूचा नाश करितां येतो आणि मृदुपणानें भयंकर नसलेल्या शत्रू चाहि नाश करितां येतो. मृदुपणानें असाध्य असें कांहींच नाहीं. यास्तव मृदपणा वस्तुतः तीक्ष्णापेक्षांहि तीक्ष्ण आहे.
For Private And Personal Use Only