________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Hollstha
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवी सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥
१ अकाले कृत्यमारब्धं कतार्थाय कल्पते । प. अ. श्लो.
तदेव काल आरब्धं महतेऽर्थाय कल्पते ॥१२॥१३८।९५ कोणतेंहि कार्य भलत्याच वेळी आरंभिलें असतां त्यापासून कर्त्यांचे मनोगत सिद्ध होत नाही. तेंच योग्य वेळी केले तर तेणेकरून मोठा लाभ होतो. २ अकृत्वा कर्म यो लोके फलं विन्दति धिष्ठितः ।
स तु वक्तव्यतां याति द्वेष्यो भवति भूयशः ॥१०।२।१७ काही परिश्रम न करता अधिकारारूढ आहे एवढ्यामुळेच अधिक लाभ घेतो, त्याची जगांत बहुत निंदा होते आणि तो दुसऱ्यांच्या द्वेषाला पात्र होतो. ३ अकृत्वा मानुषं कर्म यो दैवमनुवर्तते ।
वृथा श्राम्यति संप्राप्य पर्ति क्लीबमिवाङ्गन्ना ॥१३।६।२० कोणत्याही कार्यासाठी लोकप्रसिद्ध योग्य उपाय न करतां जो केवळ दैविक उपायांचाच अवलंब करितो त्याला, पौरुषहीन पतीशीं गांठ पडलेल्या स्त्रीप्रमाणे, वृथा क्लेश मात्र होतात. तात्पर्य दोन्ही केली पाहिजेत.
म. भा. १
उपतता
For Private And Personal Use Only