________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९८
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
६१० प्रभवन् योऽनहंवादी स वै पुरुष उच्यते ॥१३॥१४६।१५
हाती सत्ता असून ज्याला गर्व नाहीं तोच पुरुष म्हणावयाचा. ६११ प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् । ___यः स्यात्प्रभवसंयुक्तःस धर्म इति निश्चयः||१२।१०९।१०
जीवांचा उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठीच धर्म कथन केला आहे. जो उत्कर्षाने युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे. ६१२ प्रयोजनेषु ये सक्ता न विशेषेषु भारत ।
तानहं पण्डितान्मन्ये विशेषा हि प्रसङ्गिन्नः॥ ५॥३८१४४ [विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ] हे राजा, जे केवळ कार्ये पार पाडण्याविषयी तत्पर असतात, फाजील भानगडीत पडत नाहीत, त्यांना मी शहाणे समजतो. कारण, स्वतःचे आधिक्य दाखविणारे कलहाचा प्रसंग आणितात. ६१३ प्रवारणं तु बालानां पूर्व कार्यमिति श्रुतिः ॥ ५/७१७
बालकांची इच्छा प्रथम पुरवावी अशी श्रुति आहे. ६१४ प्रवृत्तवाक् चित्रकथ ऊहवान्प्रतिभानवान् ।।
आशु ग्रन्थस्य वक्ता च यः स पण्डित उच्यते।।५।३३।२८ __ बोलका, मनोरंजक गोष्टी माहीत असलेला, तर्कवान् अणि समयसूचक असून जो ग्रंथाचा अर्थ चटकन् सांगतो तो पंडित होय. ६१५ प्रसादो निष्फलो यस्य क्रोधश्चापि निरर्थकः ।
न तं भर्तारमिच्छन्ति षण्डं पतिमिव स्त्रियः ॥५॥३४॥२१ ज्याच्या मेहरबानीचा काही उपयोग नाही आणि रागापासूनहि काही हानि नाही, असा अधिपति, ज्याप्रमाणे स्त्रियांना नामर्द पति नको असतो त्याप्रमाणे, प्रजेला नको असतो. ६१६ प्रसृतैरिन्द्रियैर्दुःखी तैरेव नियतैः सुखी ।
तस्मादिन्द्रियरूपेभ्यो यच्छेदात्मानमात्मना ।।१२।२०४९ इंद्रिये मोकळी सोडल्याने मनुष्य दुःखी होतो व तीच आंवरून धरल्याने सुखी होतो; यासाठी, इंद्रियांच्या निरनिराळ्या विषयांपासून आपण आपले मन आवरून धरावें.
For Private And Personal Use Only