SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 106
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ९६ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ५९८ पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः । तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवा || १ |७४।३९ पुत् नामक नरकापासून मुलगा हा बापाचें रक्षण करतो, म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेच पुत्र असें म्हटलें आहे. ५९९ पुरुषे पुरुषे बुद्धिर्या या भवति शोभना । तुष्यन्ति च पृथक्सर्वे प्रज्ञया ते स्वया स्वया || १० | ३ ३ प्रत्येक मनुष्यामध्यें जो म्हणून शहाणपणाचा भाग असतो, तेवढ्यावरच जो तो आपआपल्या ठिकाणी खुष असतो. ६०० पुष्पं पुष्पं विचिन्वीत मूलच्छेदं न कारयेत् । मालकार इवारामे न यथाङ्गारकारकः || ५|३४|१८ बागेतील माळ्याप्रमाणे वृक्षाचें मूळ न तोडितां फूल येईल तेवढे घेत असावे. लोणाऱ्याप्रमाणे मुळासकट वृक्ष तोडून टाकू नये. ६०१ पूर्व संमानना यत्र पथाच्चैव विमानना । जह्यात्तत्सत्त्ववान्स्थानं शत्रोः संमानितोऽपि सन्।१२।१३९।३३ जेथें पहिल्यानें बहुमान मिळतो व मागाहून अपमान होतो तें ठिकाण, शत्रूकडून पुनरपि मानसन्मान मिळाला तरी, स्वाभिमानी पुरुषानें सोडूनच दिलें पाहिजे. ६०२ पृथिवी रत्नसंपूर्णा हिरण्यं पशवः स्त्रियः । नालमेकस्य तत्सर्वमिति मत्वा शमं व्रजेत् || १/७५/५१ रत्नांनी परिपूर्ण असलेली सर्व पृथ्वी, सोनें, पशु, स्त्रिया हे सर्व एकट्याला मिळालें तरी, पुरणार नाहीं असा विचार करून, मनुष्यानें मनोनिग्रह करण्यास शिकावे. ६०३ प्रक्षालनाद्धि पडून्स्य श्रेयो न स्पर्शनं नृणाम् || ३|२|४९ चिखल [ आंगावर उडाल्यावर ] धुऊन टाकण्यापेक्षां त्याला स्पर्शच न करणें मनुष्यांना सुखावह होतें. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy