________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८. कुमाराची गर्जना (श. शद्ध) ऐकून (गंडस्थळातून) मदरसाचा
प्रवाह झरत असलेला तो संतापलेला हत्ती कृतांतकाळा.
प्रमाणे कुमारावर वेगाने धावून आला. ९. कुमाराने हर्षित मनाने (अंगावर ) धावत येणा-या हत्तीच्या
सोंडेसमोर वस्त्र गुंडाळून फेकले. १०. क्रोधाने धुमसत असलेला तो (हत्ती) आपल्या दातांनी
त्यावर आघात करू लागला आणि कुमारही त्याच्या पाठीवर
दृढ मुठीचे प्रहार करू लागला. ११. तेव्हा क्रोधाने धुमसत असलेला तो मागे पळू लागला'
(पुढे) धावू लागला, चालू लागला, (अडखळत पडू) लागला.
तसेच खाली वाकला आणि गोलाकार फिरू लागला. १२. त्या श्रेष्ठ हत्तीला खूप वेळ अतिशय खेळवून व आपल्या
आधीन करून नंतर तो त्याच्या खांद्यावर चढला. १३. आता सर्व नागरिकजनांना आकर्षक बाटणारा तो गजेंद्रा
बरोबर चाललेला (कुमाराचा) खेळ अंतःपुरा (तील स्त्रियां)
सह राजाने पाहिला. १४,१५. राजाने देवेंद्राप्रमाणे हत्तीच्या खांद्यावर वसलेल्या कुमारास
पाहून आपल्या सेवकलोकांना विचारले, 'गुणांचा आगर असलेला, तसेच तेजाने सूर्य, सौम्यपणाने चंद्र, सर्व कला व आगम (शास्त्रा)त कुशल, बोलण्यात चतुर, शूर आणि
रूपवान असा हा कोण बरे कुमार ?' १६.. तेव्हा एका (सेवका) ने सांगितले, (महाराज, तेथे कला
For Private And Personal Use Only