________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
कर्माचा क्षय झाल्याशिवाय महासामथ्यंशाली देव किंवा दानवांना (ही) यांचे निवारण करणे शक्य नसेल; तर, हे देवप्रिय, अज्ञान, मिथ्यात्व, अविरती, कषायाद्वारे संचित केलेल्या स्वतःच्या कर्माचा क्षय करण्याची मी इच्छा करतो.'
तेव्हा त्या कृष्णवासुदेवांनी घरच्या नोकरांना बोलावले, बोलावून स्थापत्यापुत्राचा दीक्षाविधी करण्याची आज्ञा दिली. नंतर त्या स्थापत्यापुत्रास पुढे घालून ते कृष्णवासुदेव जेथे अरिहंत भगवान अरिष्टनेमी होते तेथे गेले. स्थापत्यापुत्राने भगवान अरि. ष्टनेमींच्या (चरणा) पाशी अलंकार काढले.
तेव्हा त्या स्थापत्यागृहिणीने हंसालंकृत वस्त्रामध्ये (वस्त्रा) भरण, पुष्पमाला व अलंकार घेतले व आसवे गाळीत असे म्हटले, 'बाळ, यत्न कर; बाळ, परिश्रम कर; बाळ पराक्रम कर आणि या (मुनिधर्माचे आचरण करण्याच्या) गोष्टीत निष्काळजी राहू नकोस.'
तेव्हा त्या स्थापत्यापुत्राने हजार पुरुषासमवेत स्वत:च पंचमुष्ठिकेशलोच केला आणि दीक्षा घेतली.
000
For Private And Personal Use Only