________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
रहस्यमंजुषिका नावाच्या दासीला सांगितले. ती म्हणाली, 'एवढा काळ (शीलाचे) रक्षण करून शीलभंग करू नका. कोणी मूर्ख तरी सागर तरून जाऊन गोपदामध्ये बुडेल का?'
वधू म्हणाली, सरवी. आता मदनबाणांचा आषात मी (सहन करू शकत नाही, तेव्हा याबाबतीत आधिक (सांगून) काय उपयोग? कोणाला तरी पाठव.'
ती म्हणाली, 'जर असे असेल तर काळजी करू (श. झुरू) नका. आपली अभिलाषा मी (पुरी) करते.'
तेव्हा तिने ही गोष्ट सासूला सांगितली. तिनेही पतीला (सांगितली). त्यानेही तिच्या बरोबर खोटे भांडण करून सुनेला म्हटले, 'मुली, ही तुझी सासु घर सांभाळण्यास पात्र नाही, तेव्हा तू सर्व (जबाबदारी) स्वीकार.'
'ठीक' म्हणून कबूल केल्यावर घरातील करावयाची सर्व कामे तिला समजाऊन दिली, तेव्हा रात्रीच्या शेवटच्या प्रहरी (म्ह. पहाटे) उठून तांदूळ वगैरे कांडणे, दळणे, पाखडणे, स्वयंपाक करणे, वाढणे, इत्यादि (कामे) आणि दुसरी अनेक लहान, मध्यम, मोठी कामे करीत असताना, फुले, दागिने कपडे, पानाचा विडा, उटी, विशिष्ट प्रकारचा आहार न मिळता क्रमाने रात्रीचा पहिला प्रहर होत असे. ती थंड, रूक्ष व अनुचित अन्न खात असे आणि अत्यंत दमून झोपत असे. अशारीतीने दररोज ( कामे ) करीत असताना तिचे रूप-तारुण्य नष्ट झाले. पानाचे विडे, (सुगंधित) द्रव्यांची उटी व शृंगार मिळेनासे झाले. काही काळ निघून गेला.
For Private And Personal Use Only