________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
काकाचा पिता म्हणून) आजोबा, (दिराचा पिता म्हणून ) सासरा आणि (आई सवत आल्याने तिचा) पुत्रही आहे. ___ तू जिच्या गर्भात जन्मलास तीही ( तिच्याच पोटी जन्मले म्हणून) आई. (पतीची आई म्हणून) सासू. (पतीची दुसरी स्त्री म्हणून ) सवत, (भावाची पत्नी म्हणून भावजय, (बालक भाऊ पुत्राच्या पित्याची आई म्हणून) आजी आणि सवतीच्या पुत्राची पत्नी म्हणून) सूनही आहे.'
ते तशात-हेचे जोवणे (श. स्तुती) ऐकून कुबेरदत्ताने वंदन करून विचारले, ' साध्वी (माते),हे (परस्पर) विरुद्ध व असंबद्ध वर्णन कसले व कोणाच्या बाबतीत आहे.? अथवा मुलाला खेळ. विण्याकरिता अयोग्य असे बोललात ?' असे विचारल्यावर साध्वी म्हणाली, 'श्रावक हे, खरे आहे. तेव्हा तिने अवधिज्ञानाने पाहिलेले त्या दोघाही जणांना प्रमाणपूर्वक सांगितले आणि आंगठयाही दाखविल्या.
ते ऐकून तीब्र वैराग्य निर्माण होऊन कुबेरदत्ता 'हाय! (कसले है) अज्ञानाने दुराचरण करविले ! 'असा (विचार करून) द्रव्य मुलास देऊन साध्वीला वंदन करून ' तुम्ही मला बोध केला, मी स्वतःचे हित करीन' असे (म्हणून) लगेच निघाली. मुनिवेष व आचार (धर्म गहण करून वैराग्य विचलित होणार नाही अशा उत्कृष्ट तपाचरणांनी देहाचा क्षय करून तो देवलोकात गेला. कुबेरसेनाही गृहिणीस योग्य असे नियम घेऊन दयाळू वृत्तीने राहू लागली. साध्वीही प्रवतिनीपाशी गेली.
०००
For Private And Personal Use Only