________________
६८ : आराधना कथाकोष रत्न पंच होते त्यापासि । तदा विधारि स्वमानसि । म्हने हे न्यावे कासियासि । कवनापासी थापिजे ॥१०९।। ऐसे मनि विचारुन । पाहू लागला सात्विक जन । निर्लोभ सत्य वाक्य भाषण । कापट्य करोन रहित ।।११०।। परद्रव्य परकामिनि । गई जे इच्छा न करिसिजनि । तद्गुणाचि कथनि । येके रसनि कोम वर्णे ।।११।। ऐसे पाहाता समुद्रदत्त । कोन्ही निर्लोभी न दिसे त्यात । तदा सत्यभूति मंत्रि विख्यात । असे नग्रात स्तोनि ऐकिले ॥११२।। तदा त्याचे गृही जाउन । विनविला तो प्रधान । तत्वरी देवोनि पंचरत्न । घालोन हेमकरंडके" ।।११३।। त्यात वदे हो मंत्रिवरा । आम्ही जातो दिपांतरा। पुन्हा येइन सप्तसंवत्सरा । रक्षण करा तववरि ।।११४।। मंत्री वदे कुमरासी । बारे ज्या काळि तू येसि । तत्क्षणी न्यावे रत्नासि । ठेविल्या वस्तुसी काय उशीर ॥११५।। अहो कापटय असे ज्याचे मनि । तो वदे मिष्ट अमृताहूनि । तयाचे कृत्य भोळे प्राणि । ऋजु प्रनामि न जानति ॥११६।। उक्तदुहा । कपटी नर न विजानिय । खसखस जैसो फूल । उपर लाल गुलाल है। नीच मरण को मूल ।।११७।। मग निश्चित होवोनि समुद्रदत्त । सागरि बैसोनि जहाजात । पंचगुरु मंत्र स्मरित । दीपांतरात पावला ।।११८। तेथे करोनि व्यापार । द्रव्य जोडिले फार । पुन्हा जहाजी बैसोनि सत्वर । स्वग्रामी सत्वर येत होता ॥११९||
१८. भला मानुस. १९. सोन्याचा, डबा. २०. सरल चिति.
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org