________________
प्रसंग पाचवा : ६७
नृपे करोनि माननिक । जानोनि मानिति सर्व लोक । मूर्ख काय जानिति विवेक । परीक्षक परिक्षिति ||१८|| येथे असो हे कथन | अपर आइका सभाजन | पद्मखंड ग्राम असे जान । जेथे धनाढ्य जन वसति ॥ ९९॥ आपुलाल्या हवेल्यावरि । कोटिध्वजा लाविल्या सिखरि । वेवसाय करिति दिपांतरि । जहाजे सागरि चालति ॥ १०० ॥ विकाया मांडिति रत्नरासी । उने नसे स्वर्ण रौप्यासी । मुक्ताफल प्रवाल विसेसि । ग्राह्यकासि वीकिति ॥ १०१ ॥ त्या नगरामाजि थोर । सुमित्र असे सावकार । जिनधर्म आचरि निरंतर । दान चार नित्य देति ॥ १०२ ॥ सुमित्रा ना करोनि । तयाचि असे भामिनि । व्रतनेमे शुभगुणि । जिनपूजनि भक्ति असे ॥ १०३ ॥ त्याहा प्रति पुण्यवंत । पुत्र असे समुद्रदत्त । पित्यासमान गुणवंत । वदे सदोदित सत्यवचन || १०४ || जिनागमि प्रतीत असे । शीलव्रत पालि सरसे । जिनपंकज तल्लीन असे । चालत असे जिनमार्गि ॥ १०५ ॥ ऐसे असता येके दिनि । वेवहार कराया लागुनि । आला त्या सिंहपुरपाटनि । क्रयान " घेवोन इकावया ॥। १०६ ।। तदा वनिग् मिळोनि सर्वे । वस्तु घेति चित्तोत्सवे | महालाभ जानोनि जीवे । देती रुपय लवकरि ||१०७॥ मग जायालागि दिपांतरि । उद्योग धरिला थोरि | मेलबोनि सर्वसामग्री प्रस्थान मुहवि साधिले ॥ १०८ ॥
१७. किराना.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org