________________
प्रसंग पाचवा : ६५
मम बंधूचा घेतला प्राण । शीघ्र मारावे याहाकारण ! ऐसे वदोनिया जान । नागकासे करोन बांधिले ||७६ || तदा ते सर्वे नागेंद्राप्रति । दीनवचने ग्लांत करिति । देवा ऐकावि आमुचि उक्ति । निज चित्ति धरोनिया ॥७७॥ हा खगेंद्र वदे आम्हासि । हा राक्षस होय मारायासि । ना तरि खाइल तुम्हासि । सिक्षा ऐसि दिल्हि यान्हे ||७८ || जैसे आम्हास कथिले यान्ह । तैस आम्हि केले जान । न्याय अन्याय निवडुन । आम्हाला गुणदंड देइ ||७९ || तद्वाक्य ऐकोनि भुवनेश" । बंधमुक्त केले सर्व्यास । टाकोनिया नागफास । विद्युदंष्ट्रास बांधिले ॥८०॥ मग स्वचित्ति विचारी । यासि मारावे कौने परि । की आपटावे शीलेवरि । होय क्षणांतरि प्राणमुक्त ॥८१॥ किंवा टाकु भयंकर वनि । व्याघ्रसिंह भक्षिति तत्क्षणि । जे हे दुःख होय यालागुनि | करीन मी यासि तैसे ॥८२॥ ऐसे विचारोनि मानसि । म्हने सागरि क्षपिजे यासी । तरि भक्ष मिले मगरमच्छासि । थोर दुक्खासि पावल ||८३ || ऐसे वदोनि उचलिला । सागरि टाकाया उद्योग केला । तत्क्षणि दिवाकरदेव आला । वदता झाला नागेंद्रात ॥ ८४ ॥ अहोहो भुजंगनायक | हा विद्याधर दिसे वराक" । यासि मारोनि काय सार्थक | पुण्यदायक होय तुज ॥ ८५ ॥
तू प्राग्भवि होता मुनिश्वर । दया षटुकाय जीवावर । पाळोनि पावला पद थोर । दया धर्म्मसार असे जगि ॥८६॥
१४. धरणेंद्र. १५. कंगाल.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org