________________
६४ : आराधना-कथाकोष
मग त्या विद्याधरान । विद्याचे बले करोन । मुनिश्वरात उचलुन । भारतक्षेत्रि नेऊन टाकिले ॥६५॥ महाक्षिप्रानदीप्रति । पंचापगा" मिळाल्या असति । नेवोनि तत्संगमाप्रति । टाकिले दुर्मति दुर्जनाने ॥६६॥ तद्देशाचे मूर्खजन । पापीष्टे शीघ्र पाचारुन । वदत असे त्याहाकारण । रे रे सावधान व्हावे तुम्ही ॥६७॥ हा आला असे राक्षस । तुम्हालागि भक्षाव्यास । सर्वे मिळोनिया यास । शीघ्र दुष्टास मारिजे ॥६८॥ ऐकोनि तयाचे उत्तर । सर्वेहि मिळोनि गवार । धोंडे काष्टाचे प्रहार । मुनिश्वरावर टाकिति ॥६९।। महादुष्ट उपद्रव । निर्दयी करिति जव जव । मुनींद्र धरिति क्षमाभाव । शत्रुमित्रु सर्व सम" मानिति ||७०॥ उक्तंच । आकृष्टोपि हतो नैव हतो वा न द्विधाकृतः । मारितो न हतो धर्म मदीये नेन बंधुना ॥७१।। तदा तो संजयंत मुनि । दुर्द्धर उपसर्ग जिंकुनि । घातिकर्म विनासोनि । उद्भविले तत्क्षणि ज्ञान केवल ॥७२॥ अहो संजयंत मुनि तदा । नासोनि अघातिक कर्मापदा । जावोनिया सिद्धपदा । अक्षय संपदा पावला ॥७३॥ तत्क्षणि निर्वाणपूजास्तव । पावले चतुर्णिकाय" देव । पूजा करिति महदुत्साव । जयजयारव थोर करिति ।।७४।। तदा मुनीचे शरीर । धरणेंद्र पाहोनि सत्वर । क्रोधरूप होवोनि थोर । म्हने दुष्ट नर हे दुराचारी ॥७५॥
११. सिंहवती, करवती, च्यामी करवती, कुरूमवती, चंद्रवेगा. १२. बरोबर; १३. कल्पवासी, ज्योतिर्वासी, व्यंतरवासी, भुवनवासी.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org