________________
६२ : आराधना कथाकोष तपबले मुनि वैजयंत । घांतिकर्माचा करोनि घात । उद्भविले केवलज्ञानात । त्रैलोक्यात अर्चनिक ॥४४॥ जानोनि केवलज्ञानोद्भव । पावले चतुनिकाय देव । करिते झाले जयजयारव । पूजादि उत्सव थोर करिति ॥४५।। तत्समइ जयंत मुनि । धरणेंद्ररूपसंपत्ति पाहुनि । ऐसी संपत्ति मजलागुनि । तपफले करोनि होइजे ॥४६।। ऐसा बांधोनि निदानबंध । तप करीतसे शुद्ध । अंतःकालि मरोनि विबुध । धरणेंद्र पद पावला !|४७।। अहो ज्या तपे करोन । अहमिंद्रपद होय जान । ते निदानदोसे करोन । नागेंद्रभुवन पावला ॥४८॥ यथा मूर्खाचा सिरोमणि । हातिचे टाकोनि चिंतामनि । काचासि धरे बलकुनि । निदान जनि जान तैसे ॥४९।। ज्ञानिजन जानोनि ऐसे । निदान न करावे सर्वसे । जो जिनपदि तल्लीन असे । उने असे काय त्यासी ॥५०॥ उक्तंच । लक्ष्मीकांत अनंतहस्तकमले, देता न भागे कदा । मागे स्वल्प तयासि कल्पतरु दे, संतुष्टभावे सदा ॥५०॥ निष्कामे भज का समर्पण करि, मोक्षादिके संपदा । ऐसा स्वामि असोनि क्षुल्लकपदा, का इच्छिसी दुर्मदा ॥५१॥ तो संजयंत मुनिश्वर । तप करिति महाथोर । त्रिकालयोग धरि दुर्द्धर । निरंतर ध्यान मौने ॥५२॥ अहो उष्णकालि तो मुनि । पर्वतसिखरि जाउनि । संतप्तशिलावरि उभे राहुनि । तप आतापनि साधिति ॥५३॥
७. शब्द ८. सूर्यासमोर
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org