________________
प्रसंग पाचवा :
ऐसा विचार करिता चित्ति । वैराग्य पावला भूपति । म्हने हे थोर राज्यसंपत्ति । जेष्टसुताप्रति देख आता ॥३२॥ ऐसे विचार करोनि मनि । संजयंतकुमरबाहुनि । वदता झासा त्यालागुनि । प्रीतिवचनि नृपवर ॥३३॥ म्हने बारे मद्राज्य थोर । त्वा घेइजे सत्वर । मी घेवोनि दीक्षाभार ! करीन सार आत्महित ॥३४॥ कुमरवाक्य ऐकोनि ऐसे । पिताप्रति वदत असे । तू का सोडिसि राज्य सरसे । पाहिले कैसे काय वाईट ॥३५॥ तदा पिता वदे गा कुमर । हा वेद्वार असे परंपरा । पित्याने राज्य देवोनि पुत्रा । करावे त्वरा आत्महित ॥३६॥ ऐसे विचारोनि अंतरि । मम वचन अंगिकारी । राज्यपट्ट बांधावे सिरी । जेन्हे हर्ष थोरि होय मज ॥३७॥ ऐकोनि पित्याचे वचन । तोडिता झाला मोहबंधन । म्हने मी तुझ्यापूर्वि जाऊन । दिक्षा घेईन त्वरित ।।३८॥ पुत्राचे पाहोनि दृढ चित्त । कुमर बाहोनि जयंत । वदता झाला तयात । मद्राज्य महंत घ्यावे त्वया ॥३९।। जयंत वदे जी मम पिता । अगा अगा संजयंत भ्राता । सांडोनिया दृढ ममता । मज का लोटिता भवजलि ।।४०।। तुम्हि सांडोनि दुःखापदा । घेउ पाहता सिवसंपदा । ऐसे पाहि जानितले दादा । न घेमि कदा राज्य आता ॥४१॥ कठिन पाहोनि दोघाचे मन । संजयंतपुत्राचा नंदन । विजयंतसामंतसाक्ष जान । राज्यस्था पुन अभिसिंचला ।।४२। मग तिधेहि बनि जावोनि त्वरा । वंदिले मुनि श्रुतसागरा । घेवोनिया संजमभारा । तप दुष्करालागि साधिति ॥४३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org