________________
७३८ : आराधना-कथाकोष
पहा पापी सुरेंद्र जाला । धर्मे सर्व सुख पावला । संतत संपत जिवाला । जैन धर्माला करा भव्य ।।२७१॥ करकंडु राज्य प्रचुर । जैनधर्म धुरंधर । माता पिता नि विद्याधर । सर्व परिवार सुखी भवेत् ।।२७२।। तीन चैत्यालय नूतन । त्याची प्रतिष्ठा आनंदान । संसार अस्थिर जानोन । वैराग्य मन उद्भवले ॥२७३।। वसुपाळ पुत्रा राज्य दिले । क्षमा आलिंगन सर्वा केले । स्त्रियाचे समुदाय मिळाले । गहिवरे दाटले जल नेत्री ॥२७४।। अठरा सहस्र गोपांगना । पट्टराण्या दशाष्ट जाना । त्यात पद्मिनी पद्मलोचना । जेष्ट भामिना राजियाची ॥२७५।। राजासी पाहोनी समग्र । हृदयी दाटे महापूर । जैसी सीता घेता दीक्षाभार । मायापूर पद्मनाभादि' ॥२७६।। जैसे नेमिनाथ लग्नवेळे । वैराग्य मनी उद्भवले । छपन्न क्रोड यादव आले । ते गहिवरले समुदायसी ॥२७७॥ की कन्या सासरी जाती । ग्रामस्त्रिया गहिवरती । की बाळक खाद्य मागती । दरिद्री चित्ती गहिवरे ।।२७८।। किंवा शांतिनाथ चक्रवर्ती । दीक्षा घ्यावया सिद्ध होती । शाहान्नव सहस्र स्त्रीचित्ती । गहिवरती मायामोहे ॥२७९।। तेवि करकंडु विरक्त । सद्गुरूपासी दीक्षा घेत । माता पिता पद्मावती ते । जालि दीक्षित तुर्यवर्ग' ॥२८०।। तप करिती जगत् सार । भवसिंधु पार उतार । अंतःकाळी संन्याससार । श्री जिनेश्वर ध्यान मनी ॥२८१।।
१. पद्मनाभ म्हणजे रामचंद्र सीता, २. म्हणजे चार.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org