________________
प्रेसंग एक्कावन्नावा : ७३१
सैन्य समुदाय चालले । जिनेंद्र चैतालय देखिले । हस्तिवरोन उतरले । शिखर देखिले मनोज्ञे ॥ १८८ ॥ तेथेचि राहोनी समग्र । पूजावयासी श्रीजिनेंद्र | शुद्ध अष्टविधप्रकार । जयजयकार गर्जताती ॥ १८९ ॥ मानस्तंभ पाहोनी नैनी । मान गळिती मानाभिमानी । महाद्वारी उभे राहुनी । वर्धमान नयनी देखिले ॥१९० ।। जय जय शब्द मुखी वदती । परोक्षवदना भावभक्ती | तीन चौसोप्या वोलांडिती । वेदिका पाहती अनुपम ।।१९१ ।। पंचरंगी स्फटिकाकार । हिरे माणिक चौफेर । पहाता दृष्टि अगोचर विलोकिता नेत्र चाचरति ।।१९२।। तीन सिंहासनावरुते । जिनवर्धमान शोभत ।
I
तीन छत्र रत्नजडित । पताका शोभत शुभ्रता ।।१९३।। सूर्यासमान पत्रछेत्री । चामर ढाळिती पूज्य मंत्री । मंत्रघोशनादीर्घसूत्री । जयशब्द वक्त्री गर्जताती ॥। १९४ ।। रायश्रीफळ द्रव्य करी । ठेवोनी मुखी जय उच्चारी । देवा साष्टांग नुति करी । प्रदक्षिणा करी त्रिविध ।।१९५ ।। दर्शनपाठ म्हणोनिया । पुनः पुनः वंदन पाया । गुरुगादिसी पाहोनिया । नमोस्तु स्वामिया पंचांगी ।।१९६ ।। ते मुनीराय अवधिज्ञानी । रत्नत्रय धर्मं सद्गुणी । पंच महाव्रत पाळनी | समिती मनी पंच युक्ती ॥१९७॥ पंच इंद्रियनिरोधीति । षड् आवश्यक त्रिगुप्ती । पंचाचार पालन करिती । सांगति धालक्षन ।। १९८।।
तेव्हा राजा कर जोडून । विनंती करी विनयान । स्वामी भवांतर सांगण । कृपा करोन गुरूराया ।। १९९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org