________________
७३० ! आराधना कथाकोष
बळघाट अमृतवन । गरुडगंगा वलांडुन । तेरपुर ग्राम पाहून । तेर नदीस्थान उतरले ॥१७६।। देशिक राजे भेटी येती । महा आदरेण भावभक्ती । धार्मिक प्रतिक सत्कीति । भिल्लवस्ती तेरमध्ये ॥१७७॥ प्रांतातील भिल्ल मिळोन । वस्तीस समूह मिळोन । कमळपुष्पफळ मनोज्ञ । रायाकारण भेटविली ॥१७८।। सन्मान देवोनी तयासी । पुसती शुभ वृत्तान्तासी । वेणु भिल्ल वदे रायासी । करद्वयासी जोडोनिया ॥१७९॥ दक्षिणदिशी पंचक्रषे । चारुपर्वत मनोज्ञ असे । तळि तडाग वन असे । जळासरिसे भरपूर ॥१८०॥ त्या चारु पर्वताउपरि । वस्ती धारासीव नगरी । मध्येभागी जिनमंदिरी । शोभा भारी हा अनुपम ॥१८१॥ सहस्रस्तंभ चैत्याल्यासी । बारदारी चौदिशेसी । मानस्तंभ तुर्यद्वारासी । मानगर्वासी गर्वहार ॥१८२॥ त्रयचौसोप्या मध्यंतर । वेदिका अत्यंत सुंदर । सिंहासन सुवर्णाकार । माणिक हिरे रत्नमय ।।१८३।। त्रिकाळ श्री जिनपूजन । श्रावक श्राविका मिळोन । गंधोदक आरती करून । नवविधा पुण्य जोडिती ॥१८४॥ त्या पश्चिम पवन दिशी । दरी पर्वतमस्तकासी । वारूळ असे त्या स्थळासी । ऐरावती त्यास पूजीत ॥१८५॥ भावभक्तीन नित्य नित्य । शुंडादंडेन जळ आनीत । वल्मीकासी अभिसिंचित । आश्चर्य आम्हात राजेश्री ॥१८६॥ ते करकंडु ऐकोनिया । हृदयी हर्ष धरोनिया । भिल्लासी वस्त्र देवोनिया । हस्ती पहावया हरुष ॥१८७।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org