________________
५० : आराधना कथाकोष द्रव्य खर्चीनिया फार । नतन केले शिवमंदिर । नयनि पाहता अति सुंदर । शिवमहिमा थोर वाढविलि ॥३३॥ अहो ज्या धर्माचा साह्यकारि । नपति असे परोपरि । त्या महिमाचे आश्वीर्य अंतरि । जनचतुरि न मानिजे ॥३४॥ अष्टादशखं दिनप्रति । शिवासि नैवैद्य चढविति । पक्वान्न करोनि नाना भाति । नेत्राप्रति प्रियकारि ॥३५॥ पोळिया करोनि पातळ । सेवया आणि भात दाळ । जुदे जुदे भरोनि स्थाल । नैवेद्य रसाल विस्तारिति ॥३६॥ पूर्ण पोळचा मांडे वडे । तक्रमिश्रित चनवडे । सेकोनि उच्छल पापडे । इश्वरापुढे चढविति ॥३७॥ लाडू आणि अनारसे । दधिवडे करोनि सरसे । दृष्टि पाहता क्षुद्रोगनासे । विस्तारिले असे स्वर्णताटि ॥३८॥ वरफि आणि बाबर । दुग्ध पेडे पारे शर्कर । जिलब्या लड्डू मोतिचूर । करोनि प्रचुर योग्य स्त्रिया ॥३९॥ फेणिफिनले संजोरिया । सेव दिवडे पाकोनिया । नानाविध भरोनि थालिया । चतुर स्त्रिया निर्मापिले ॥४०॥ नाना परिचे पक्वान्न । मुखरोचक बहुव्यंजन । तिक्ताम्ल क्षार कषाय मेलुन । त्या विना भोजन वृथा असे ॥४१॥ दधि दुग्धाचे भरोनि माठ । आणि इक्षुरसाचे घट । ग्राम स्त्रिया मिळोनि येकवट । चरूचे ताट घेति स्वकरि ॥४२॥ भक्तजन मिलोनि समस्त । गीतवाद्योत्सव करित । शिवमंदिरि जावोनि त्वरित । नित्य नैवेद्या चढविति ॥४३॥ शिवकल्पित पक्वान्न । तत्सेवक जाति घेउन । करिति निज कुटुंबपोषण । कालक्षपण नित्य करिति ॥४४॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org