________________
७१२ : आराधना-कथाकोष अहो हो सत्य दुष्टबुद्धी । दुराचारी तो पापी कुधी। त्यासी नयेचि सुसद्बुद्धी । बिळामधी उलूक जैसा ॥१८७।। तेव्हा ते मुनीराज धीर । तेथोन चालले स्थिर स्थिर । वृक्षातळी ते जाली रात्र । स्वशरीरी निःस्पृह असे ।।१८८।। ते मुनी रत्नत्रयधारी । द्वादश भेद तपकरी। पंचाग्नि साधिती शरीरी । बाविसापरी परीषह ।।१८९।। प्रातःकाळी तो कुंभकार । त्याने पाहिले मुनीश्वर । समजले कर्तृत्व सार । धम्मिलावर क्रोध करी ॥१९०॥ दोघहि झगडा करिता । रौद्रध्यान मृत अवस्था । क्रमेण जन्म त्यापुढता । वनातौता व्याघ्र सूकर ॥१९१॥ धम्मिल जाहला तो व्याघ्र । देविल जन्मला सूकर । विध्याचलपर्वतावर । वनगुहार क्रीडताती ॥१९२॥ तत् समयी देवयोगेन । मुनी तपस्वी दोघे जन । समाधिगुप्त त्रिगुप्तीभान । त्रैलोक्यजन पूजनीक ॥१९३।। त्या मुनीसी पाहोनिया । जातिस्मर सुकरा तया। स्वामिसन्मुख बैसोनिया । मुनीरायासी व्रत मागे ॥१९४॥ व्रत घेवोनी भक्ती करी । तेव्हा तो व्याघ्र वनांतरी । नापितचर पूर्ववैरी । आला सत्वरी मुनीभक्षार्थ ॥१९५॥ तेव्हा सूकर गुंफेद्वारी । मुनीरायाचे रक्षण करी । व्याघ्र येताची सत्वरी । देत विदारीतो व्याघ्रासी ॥१९६॥ महायुद्ध परस्परते । रौद्रध्यानान जाल मृत । व्याघ्र गेला तो नरकासी । रक्षितो मुनीसी सूकर ॥१९७।। तत् पुण्य अतिशय थोर । जाला स्वर्गवासी कल्पेंद्र । त्या अनेक ऋद्धि देवेंद्र । रूपसुंदर देवांगना ॥१९८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org