________________
प्रसंग पन्नासावा : ७११
शिखरबंद जिनागार । कनकांचन घटाकार । ध्वजा पाल्लवि यारे यारे । शुभ पुण्य घ्यारे पाल्लवी ।।१७५ ।।
य शांते दर्शनमात्रेण । दर्शनान पापनाशन । अष्टकर्म ते निवारण | धर्म धन्य कोन्हा वर्णवे ।। १७६ ।। त्यास्थळी श्रीसद्गुरू नित्य । रत्नत्रयेसी विराजित । तीव्र तपस्या ते करीत । शिवमार्गात पाहताती ।। १७७ ।। श्रावक आनि श्रावकिनी । धर्मं धारि दशलक्षणी । गुरुमंत्र ध्यानि जपनी । पूजादानी व्रतान्वित ।।१७८।। अठरा दोषरहित देव । पूजिती इंद्रादिक देव । पंचज्ञानाचे जे वैभव । देवाधिदेव तीर्थंकर ।। १७९ ।। दशलक्षणी धर्म जानावा । गुरू निर्गंथ वोळखावा । सिद्धान्त ग्रंथ ऐकावा । लक्षण जीवा सम्यक्त्व हे ।। १८० ।। दानपूजा जिनचरणी । स्वर्गमोक्षसुखाची खानी | सुपात संतोष सुदानी । पात्र पाहोनी नित्यशः ।। १८१ । । शीलव्रती ते उपोषण । द्वादशभेद तप करून । अंती त्या समाधिमरण निदानबंधन सद्गती ॥१८२॥ घटग्राम संपदासार | देविला नाम कुंभकार | धनवान् भरितभंडार । सुखी संसार नांदतुसे || १८३ || तेथेचि तो एक नांदत । धम्मिला असे तो नापित । तेन पथिकलोकात । मुनिवासात निर्माविले ।। १८४ ।। तेथे तो देवकुळ एक । देविला असे त्याचा लेक । वसती आले मुनीनायक । वसतीस्थानक देतु तया ॥ १८५ ॥ धमिला तोचि अविवेकी । कुबुधी दुष्ट तो पातकी । शब्दबाण मारत मुकी । एकाएकी दुराविले त्या ।। १८६ ॥
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org