________________
७०८ : आराधना -- कथाकोष
उपदेश सर्वास केला । पुनः आले पूर्वस्थळाला । कोठारात ग्रंथ ठेविला । करोनी पूजेला यथाविधी ।। १४१ ।। त्या स्वर्गसुख आयुष्यांती । अनुक्रमेण मोक्षप्राप्ती । ते पुस्तक गोविंदाप्रती । पुण्यप्राप्ती पद्यनंदी || १४२ ।। तेन उपदेशोनी जगात । मार्गप्रभावना बहुत । गोविंद गोवळ आयुष्यान्ती । व्याळभक्षित तत् क्षणी ।। १४३ ॥ गुरुमंत्र करोनिया तो । निदान बंध चितित तो । ग्राम भूपाचा पुत्रोत्पत्तो । पुण्यसंयुक्त राज्यकुळी || १४४ || सुषेण नाम अभिधान | वृद्धी करी इंद्रासमान । माता पिता मनरंजन । पूर्वपुण्येन यौवनभर || १४५॥ एकदा तो पद्मनंदी मुनी । भावाहार स्वीकारोनी | सुषेण अवलोकी नैनी | हृदयभुवनी जातिस्मर || १४६ || पूर्वजन्मीच सारासार । जानोन केला नमस्कार । दीक्षा घेतली भवतार | आनंद फार हृदयी त्या ॥ १४७ ॥ मुनिक्रिया गुरूवचनी । एकलविहारी होउनी । तीव्र तप देह ठेउनी । राजभुवनी जन्म त्यासी ॥१४८॥ कौंडेश त्या नामाभिधान | वृद्धी करी इंदुसमान । तेजस्वी जै गगनी भान । रूपलावण्य हरिपुत्र ॥ १४९ ॥ महा विभूती त्या संपन्न । स्त्रिया सौभाग्याच मंडन । महासौख्य भोग भुंजान । सत्कीर्तीवान् विराजित ॥ १५० ॥ देवभक्त गुरूआज्ञेत । शीलवंतव्रत्तमंडित । पुत्रवत् प्रजा पाळीत । दान देत नित्य चतुर्विध ।। १५१ ।। एके दिवसी सभास्थानी । आचारभ्रष्ट श्रुतश्रवणी | कौंडेशकारण ऐकोनी । असार जानोनी संसार ।।१५२।।
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org