________________
प्रसंग पन्नासावा : ७०७
शुद्धज्ञाने विमलकीर्ती । ज्ञानेन सुखाची संपत्ती | ज्ञानेन मुक्ती भुक्ती प्राप्ती । अनंतकीर्ती बळ अनंत ।। १२९ ॥ सम्यग्ज्ञान जिनेंद्रोक्त । वैरविरोधविवर्जित । सुज्ञान गर्वरहित । विनयान्वित श्रुतभक्ती ॥ १३० ॥ दानेन मान्य जगत्सार । पूजन प्रभावना थोर । पठन पाठन ज्ञाननेत । श्रीजिनेंद्र वचन सत्य ।।१३१।। वाचना पृच्छना अनुप्रेक्षा । आम्नायसहित विवक्षा । धर्मं उपदेशज्ञा दक्षा । ज्ञानचक्षा पंचविधाते || १३२|| करावे दान भव्य प्राणी । केवळज्ञानाची ठेवणी । बहु विनययुक्ती मनी । जिनवाणीते जे गदितं ।। १३३ ।। ऐसे जानोनी शास्त्रदान | करावे मोक्षाचे साधन । हे कर्तृत्व केले कवन । ते निरोपण आयकावे ।। १३४।। कौंडेश राजा महीपाळ । प्रसिद्ध असे भूमंडळ । तेन पुण्य केल निर्मळ । ज्ञान केवळ तो सिद्धान्त ॥ १३५ ।। जंबूद्वीप भरतक्षेत्र | जिनधर्म असे पवित्र । कुरूमेरी ग्राम विचित्र | श्रावक सर्वत्र नांदती ।। १३६ ।। तेथे गोविंद गोपाळक । निबिड वनी क्रीडा नेक । तेथे गुंफा देखिली एक । श्रीजैनपुस्तक सुंदर ।। १३७।। त्यान पुस्तक घेवोनिया । श्रीपद्मनंदी मुनीराया । नमोस्तु करोनिया तया । ध्यावे स्वामिया तुम्हार्पण || १३८ || पूर्वी तेच शास्त्रदानासी । दिधले होते भट्टारकासी । तेने विहार जगासी । धर्मप्रकासी प्रभावना ।। १३९ ।। भव्य जीवा संबोधोनिया । पूजा उद्यापन करोनिया । सप्तक्षेत्र पुण्य उदया । श्रावकतनया संबोधी ॥ १४० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org