________________
प्रसंग एकोणपन्नासावा ॥ श्री वीतरागाय नमः॥
प्रथम नमु जिनदेवा । श्रीगुरूराय ज्ञानठेवा । माय सारजे मार्ग दावा । कवित्व भावा बाळकासी ॥१॥ पंच परमगुरू वंदु । ज्ञानदाता दयेचा सिंधु । श्रोता सावध कथा प्रबंधु । पाप अगाधु निशीभुक्त ॥२॥ रात्रीभोजन सोडा तुम्ही । क्रिया शुद्ध आचारधर्मी । ते कर्ता सर्व सुखधामी । नृसुरयोनी निर्जर तो ॥३॥ कीर्ती कांती ते महाशांती । संतती संतती सुभक्ति । आरोग्य काया शुद्धमती । रात्रिभुक्ती विवर्जनात् ॥४॥ नव विध पुण्यकारण । पुनः नरदेहासी येन । रात्री भोजन न करण । अनुक्रम जाने मोक्षासी ॥५॥ निशि भोजन करू नये । दरिद्र रोगी काया होय । अंध पंगु कुशील होय । अल्प आयु निशिभोजनात् ॥६॥ रात्री भोजन करिताती । पतंग कीट पडताती । मुंगी सूक्ष्म जीवाच्या पंक्ती । जिवासी होती मांसदोषे ॥७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org