________________
प्रसंग तिसरा : ४५
वैद्य वदे हो सद्गुरु स्वामी । संसृतिरोग फेडाया लागुनि । विलोकि समर्थ नसे कोन्हि । तुजवाचुनि मुनिराया ॥९३।। पुन्हा मुनि वदे त्यासी । शरीररोग नासायासि । प्रयोजन नसे मजसि । लाविता थुक्यासि दूर होती ॥१४॥ ऐसे वदोनि त्याकारन । घेवोनिया निष्टिवन । वामकरात करिता स्पर्शन । दिसे तप्त स्वर्ण सम बाहु ॥९५।। स्वर्णशलाकावत् पाहोनि पाणि । देव थोराश्चर्य मानिति मणि । म्हने धन्य धन्य महामुनि । दिसे त्रिभुवनी वंदनिक ॥९॥ मायारूप करोनि दूर । तत्पदि करोनि नमस्कार । म्हने हो स्वामी कृपासागर । चारित्र दुर्धर दिसे तुझे ॥१७॥ इंद्रसभेसि बैसोनि स्वता । त्वच्चारित्र झाला वर्णिता । संशय आला मम चित्ता । त्याकरिता आलो पाहावया ॥९८॥ तव चारित्राचे गुण । इंद्राने जैसे केले वर्णन । अधिक दिसति त्याजहून । पाहोनि मन्मन संतोषिले ॥९९।। धन्य धन्य तव चारित्र । त्रैलोक्यामाजि पवित्र । कर्मवैरि सिरच्छेदनशस्त्र । त्रिजगत्र चित्रकारि ॥१०॥ पुनःपुन्हा करोनि स्तुति । वारंवार करिति नुति । जिनशासन धरोनि प्रीति । स्वर्गाप्रति गेला त्वरे ॥१०१॥ तदा सनत्कुमार मुनिश्वर । करोनि तप अति दुर्धर । घातिकर्माचा करोनि संहार । उदेला भास्कर ज्ञान केवल ||१०२॥ आसन होताचि कंपारव । अवधिज्ञाने जानोनि सर्व । यवोनि चतुर्णिकाय देव । थोर उत्सव करिताति ॥१०३॥ कैवल्यज्ञानाचे पूजन । करोनि सर्वे भव्यजन । योग्य पाहोनिया स्थान । पाणि जोडून बैसले ॥१०४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org