________________
६४० : आराधना-कथाकोष ते ऐकोनिया कोतवाल । द्यूतसाळेसि ठेविले । जुव्हारियासी दाखविले । सांगितले प्रमाण त्यासी ॥४१।। या कंकनाचे प्रभावे । आम्हा अयोध्यच राज्य व्हावे । सिंहासनावरी बैसावे । सहा खंड जिंतावे स्वबळे ।।४२।। द्यूतकार म्हणती अहो स्वामी । तुमची सेवा करू आम्ही । राज्यभार मागावा तुम्ही । चक्रधरस्वामी विनवा ॥४३।। त्वरित आला पितृपासी । इच्छिले सांगे जे मानसी । पुण्याविना हो मानवासी । कैच तयासी सुख प्राप्त ।।४४।। प्राणी इच्छिति सर्व सुख । प्रारब्ध घडवी अनेक । पुण्याविना इच्छिल सुख । दुर्लभ देख राजिंद्रा ॥४५।। पुत्र पाहिला राजियान । काय ईच्छा वद वचन । काही न सुचे त्या कारण । मौन धरोन राहिला ।।४६।। त्यास सुचली एकमति । जाऊन पुसु मातेप्रती। सुमित्रा माता गुणवंती । जीर्ण झोपडी कष्ट भोगिती ।।४७।। पुत्रलोभ धरोनी चित्ती । येइ येइ बापा म्हणती । त्वरित आला मूढमती । वार्ता तिजप्रति सांगतु ॥४८।। ते ऐकिले सर्व मातेन । पुत्रा रायासी माग भोजन । मनइच्छित तुझिया मन । ते मागून घे रायासी ।।४९।। पुनः येवोनी रायापासी । उभा राहिला मौन मुखासी । पुत्रलोभे पुसे तयासी । इच्छा मानसी ते सांगावे ।।५।। बापा देई मज भोजन । मनइच्छित पक्वान्न । पुत्रजनक विनोदान । माग तू भोजन चोल्लक ॥५१।। ब्रह्मदत्त राजा पुसे । तुझे भोजन ऐसे कैसे । जे इच्छा असेल मानसे । सांगावे आम्हासे त्वरित ।।५२।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org