________________
प्रसंग सत्तेचाळीसावा । ६३९
पितृवचनेसी पाळीच ना । मातोश्रीचा शब्द ऐकेना । स्त्रीसंपदा भोगवी नाना । मूर्खराजचिह्ना न जानेची ॥२९॥ त्यासी कैसा हो राजमान्य । पुण्यविना कैचा सभामान्य । गुरूची सेवा नसे ज्ञान । नरदेहा येऊन खरपसु ॥३०॥ तदा तो सुमित्रा मातेसी । जीर्ण झोपडी बैसवी तीसि । कदान देतसे खावयासी । दास विषयिकासी पक्कान्न ॥३१॥ कुपुत्र मातेसी बंध केला । तांबूल मोदक न दे तयेला। ऐसे श्रम त्या मातोश्रीला । कुळी जन्मला कुलांछनी ॥३२॥ पिता सांगे हिताची गोष्ट । ते नायकेची महादुष्ट । पित्याहृदयी महाकष्ट । अहो हा नष्ट कैसा तरी ॥३३।। ऐसे करीता भरयौवन । वसुदेवा प्राप्त तारुण्य । अंगरक्षक समसमान । चंचळ पन मनस्वी तो ॥३४॥ असो एकदा चक्रवर्ती । गमन आव्या वनांती । रोगपीडित अश्वहस्ती । वसुदेवाप्रति दिधला ॥३५।। त्या अश्वासी खद्यचारु । तुरकी तुरंगम वारू । उडान चक्र नृत्यकारु । तेज अपारु तो तेजस्वी ॥३६।। ते अवलोकुनी चक्रवर्ती । प्रस्तावा करीतसे चित्ती । दुर्बळ अश्वासी बहुकांती । जेवि दीप्ती तैलशिखा ॥३७॥ संतोष होउनी चक्रेश । पृच्छा केली जगास । ते श्रुत जाले वसुदेवास । सांगे पित्यास सर्व वार्ता ॥३८॥ पखंडाधीश ऐकोनिया । शाबासकी दिधली तया । करीच कंकण देवोनिया । अश्वास न तयासि दिधले ।।३९।। वसुदेव गेला अयोध्येसी । सांगता जाला कोतवालासी । चक्रवर्तीन हे आम्हासी । स्वकरकंकणासी अर्पिले ॥४०।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org