________________
प्रसंग सत्तेचाळिसावा
ॐ जय ॐ नमः सिद्धेभ्यः श्री वीतरागाय नमः
ॐ नमो पंच परमगुरू । जे भवसागराचे तारू । त्याहासी साष्टांग नमस्कारू | कवित्वा आधारू जिनराय ॥१॥ ॐ नमो ते माय वाग्वादिनी । अज्ञानासी ज्ञानदायिनी । ग्रंथकर्त्या हृदयभुवनी । साह्यकारिनी तूचि माय ॥२॥ गुरूराज श्री रत्नकीर्ती । तुमची आज्ञा अज्ञानाप्रती । कवित्व बाळबोधयुक्ती । द्यावी मती साह्ये होउनी ||३|| श्रोता सम्यक्त्वी धर्मवंत । ग्रंथश्रवणी अर्थवंत । हस्तदोष व्यंग पडत । साहांकारि तेथ भव्य प्राणी ||४|| श्लोक : - नमस्कृत्य जिनं देवं सुरासुरसमचितं । वक्षेहं परजंतूनां गुणग्रहणसत्कथां ॥५॥ परदोष त्यागी जो नर । स्वल्पगुणाचा करू विस्तार | उत्तम गुण शास्त्राधार । जिनगुणसार प्रकाशिती || ६ || स्वर्गी इंद्रसभेचे आत | जिनगुणचर्चा ज्ञानवंत | करिता त्याते इंद्र पुसत । भूमीतळात ऐसा कोन ||७||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org