________________
प्रसंग शेहेचाळीसावा : ६३५ वेगवती आदि शतपुत्री । तव रूपची कीर्ती थोरी । ऐकोनी जाला विह्वळआंगी। मनाअंतरी ईच्छा तुझी ।।२०३।। तत् समीप नेते तुम्हासी । ऐकोनी हर्ष जाला मानसी । शाबास म्हणे खेचरीसी । विद्याचलासी पोहोचले ॥२०४।। विद्याधराच्या कन्यारत्न । विवाह जाले विधीयुक्तीन । अनेक राजे ते जिंतून । स्त्रियारत्न परनिल्या त्या ॥२०५।। नवनिधी चौदाच रत्न । शहान्नव सहस्र स्त्रीरत्न । साहाखंड पृथ्वी जिंतुन । पदपावन त्या चक्रवर्ती ।।२०६।। विजयी होऊन गृहासी । नमस्कारी मातापित्यासी । स्थापना केली जिनधर्मासी । जिनमंदिरासी उभविले ।।२०७।। अष्टान्हिक उद्यापन । करोन रथयात्रा मिरवण । मिथ्यामत केले खंडन । श्रोते जन परिसा तुम्ही ॥२०८॥ त्रिभुवनकीर्ती रत्नमणी । तत् शिष्य बिजआश मनी। मज न कळे कवित्व कर्णी । गुरूअज्ञे करूनी केलेसे ।।२०९।। श्लोक:-स जयतु जिनदेवोदेव देवेंद्रवंद्यः । यदुदितवरधर्मे शर्मभात्री जनःस्यात् ॥ गुणगणमणिखानिः स्वर्गमोक्षप्रयोनिः । सकळभुवनचंद्रः केवळज्ञानसांद्रः ॥२१०॥ इति आराधना कथाकोश । ऐकता वक्त्यासी महाहर्ष । पापक्षय सर्वदोषनाश । मोक्षमार्गास लावी भव्या ॥२११॥
इति कथाकोशे हरिसेनचक्रवर्ती आख्यान चंद्रकीर्तीविरचिते छेताळिसमोध्याया संपूर्ण शुभं भवतु कल्याणमस्तु जय जय ॥ प्रसंग ४६ ।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org