________________
प्रसंग शेहेचाळीसावा : ६३१ श्री जिनेंद्र नमु भक्तियुक्ती । केवळज्ञान मुखोत्पत्ती । कथा सांगु हरिसेन ख्याति । पुण्याश्रव होति श्रवणे ।।१५५॥ अंग देश असे विख्यात । कपिला नगरी असे त्यात । राजा सिंहध्वज पुण्यवंत । स्त्री गुणवंत वप्रादेवी ।।१५६।। तत् पुत्र हरिसेन ज्ञानी । वीर्य शौर्य तो राज्ये मानी । धर्मतत्पर सप्तगुणी । पितृजननीसमवेत ।।१५७।। ते वप्रादेवी शुद्ध श्राविका । श्रीजिनपदाब्जभाविका । नंदीश्वरव्रत अष्टान्हिका । जिननायका पूजाविधी ॥१५८।। तथा तयसी सापल्यरानी । लक्ष्मीमती असे कुज्ञानी । रायासी म्हणे प्रीती करोनी । रथ मिरवणी माझी आधी ।।१५९।। ते राणी कुगुरू मिथ्याती । ब्रह्मरथ तयार करिती । ते ऐकोन विप्रादेवी । प्रतिज्ञा करिती सुधार्मिक ।।१६।। रथयात्रा मी आधी करीन । तेव्हाच करीन भोजन । निश्चय अंतरी करोन तीन । रथमिरवण चिंताग्रस्त ॥१६१।। तत् समयी भोजनार्थ । हरिसेन आला मंदिरात । माता पाहिली चिंता चित्तात । माते किमर्थ म्लानमुखी ॥१६२।। बापा मम अष्टाह्निक व्रत । करोन चाले मम रथ । राज भार्या मिथ्यामत्तात । मम अग्ने रथ मिरवी म्हणे ॥१६३।। विचार सांगोनी मातेस । भोजन घालावे आम्हास । आम्ही जिंतुनी देशविदेश । जिनधर्मप्रकाश रथयात्रा ||१६४॥ माते असावे स्वस्थ चित्त । आहार करोन यथास्थित । निघता जाला अतित्वरित । फिरत फिरत चालला तो ॥१६५।। वोलांडिली वन उपवन । तस्कर गुंफा पाहली त्यान । विद्युत्चोर नामाभिधान । राघोच पाळन वृक्षावरी ।।१६६।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org