________________
६३० : आराधना कथाकोष
म्हणे म्यां गांजिले मुनीसी । पाप बैसले मम शीषी । शरण असावे आता पासी । तेन पापासी होईल खंड ।।१४५।। तेव्हा विचारोनी मनात । वनवल्ली आनिली त्वरित । रस घालोनी घायात । दिव्यदेहात मुनी जाहले ।।१४६।। पुनः पुनः तो स्तुती करी । मस्तक ठेवी चरणावरी । उपसर्ग केले नानापरी । अपनिंदा करी बांदर ।।१४७।। मुनीन साहिले परीषहासी । अवधीज्ञान जाले तयासी । पूर्वभवांतर वानरासी । सांगतात तयासी पश्चात्ताप ।।१४८।। तेव्हा तो मर्कट ऐकोनी । मुनीवाक्य धर्मश्रवणी । स्वर्गमोक्षाची ते ठेवनी । कर जोडोनी करी विनती ॥१४९।। स्वामी भी अन्यायी पतित । मज सांगावे आत्महित । मग त्यासी दिल्हे अणुव्रत । निश्चय सम्यक्त्व पाळी तू ॥१५०।। सप्तदिन सर्व संन्यास । मरोन गेला तो स्वर्गास । महद्धिक सौधर्मस्वर्गास । सर्व सुखास संपूर्ण आयु ।।१५१।। जैन धर्म जंतु करिती । तयासी होय सुखप्राप्ती । तिर्यंच मर्कटा स्वर्गप्राप्ती । पुण्य जोडिती गुरूप्रसादे ।।१५२।। तस्मात् गुरूआज्ञाप्रमाण । स्वर्गमोक्षाच ते कारण । श्रोता व्हावे सावध मने । तीर्थेश वचन दृढ करा ॥१५३।। श्लोकः-स जयतु जिनधर्मो यत् प्रसादात् जनोऽयं । भवति सुरनरेंद्रश्रीशिवश्रीपतिश्च । तदिह विदिततत्त्वैः श्रीजिनेंद्रोक्तधर्मे । परमपदसुखाप्त्यै सारयत्नो विधेयः ।।१५४।।
॥ कथा ९७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org