________________
६२८ : आराधना-कथाकोष श्रीजिनासी शतादि इंद्र । पूजा करिती निरंतर । तत् पदी करू नमस्कार । व्रतयोगेंद्र सांगेन पै ।।१२१।। सोरटदेस असे विख्यात । द्वारका नगरी असे त्यात । हरिवंशी तो कृष्णनाथ । पुण्यवंत पूर्वदत्तेसु ॥१२२।। सत्यभादि रुक्मिणीसती । सोळा सहस्र भामा असती । सप्तरत्न त्रिखंडमती । राज्य करिती द्वारकेचे ।।१२३॥ एकदा श्री नेमीश्वर । समोशरण गिरिनेर । वंदावया यादवेंद्र । समुदाय समग्र चालले ॥१२४।। जाता मार्गी सुनतमुनी । सुतपस्वी तो धर्मध्यानी । व्याधि क्षीणांग पाहे नैनी । श्रीकृष्णमनी दया आली ।।१२५।। जीवकाख्य तो महावैद्य । त्याच्या हस्ते केले औषध । क्षीर लाडु मोदकसुध । गृहिगृही बोध श्रावकासी ॥१२६।। नित्य त्या भावरीवेळेस । तुम्ही द्यावे औषधास । आहार करिता मुनीश । सर्वांगास सुध जाहला ॥१२७।। शुद्ध चारित्र धर्मध्यानी । दिव्य देह जाला मुनी। नवविधा पुण्यदाता जनी । तुर्यदानी सप्त विधीयुक्त ॥१२८।। श्लोक:-श्रद्धा-भक्तिशक्तिर्मुदाविज्ञानदयाच शांति । लुब्धतासप्तगुणास्तं दातारस्य प्रशंसिताः ॥१२९॥ श्रद्धा मनी जे तो निश्चय । भक्तीमन जे मनास प्रिय । शक्ति सर्व युक्तीची होय । ज्ञानाची सोय विज्ञान दया ।।१३०॥ दया षटकायासी निपुण । शांती ते पृथिवीसमान । ऐसा दाता पुण्यपावन । लुब्धता गुणज्ञ सुपात्रासी ॥१३१।। तदउपमेन वासुदेव । दानादि पूजा भक्तिभाव । तीर्थंकर गोत्री केला जीव । मोक्षवैभव मेळविले ॥१३२।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org