________________
प्रसंग शेहेचाळीसावा : ६२७
म्हणती क्रूर देवता आली । मंत्राची परीक्षा पाहली । हीनाधिकाक्षर वोळखिली । शुद्ध केली ते बुद्धीबळे ॥ ११० ॥ अर्थ पाहोनीया व्याकरण । जानोनी त्यांनी ज्ञानखुन । तत् श्रुतदेवता येवोन । अभय देवोन स्थापिले ॥ १११ ॥ तेव्हा ते दोघे ब्रह्मचारी । विद्यासिद्धी जाल्यावरी । येते जाले ते झडकरी | गुरूपदावरी मस्तक ॥ ११२ ॥ गुरू विनयभक्ती करोन । सर्वं सांगितले निरोपण | कुदेवीचे जाले दर्शन । हीनाधिकाक्षरान अनर्थं ॥ ११३ ॥ शुद्ध पढता ते सुदेवी सरस्वती ते श्रुतदेवी | हृदयोत्पन्न ज्ञान दावी । सुबुधी बरवी गुरूकृपे ॥११४॥ शीषयुक्ती ऐकोनिया । परम संतोष गुरुराया । शाबास म्हणे शीष सखया । ज्ञान उदया देवकृपेन ॥ ११५ ॥ तेव्हा तो योगींद्र धरसेन । शुद्धपाठे तुष्टायमान । सिद्धान्तकर्ता धर्म जैन । प्रकाशकारण शीष हे ॥ ११६ ॥ मुनी सांगती शुद्ध पाठ । शीष पढती होऊनी धीट । आगम सिद्धान्त असे श्रेष्ठ । धर्म गरीष्ट धुरंधरौ ॥११७॥ ऐशापरी धर्मप्रकाश । शास्त्रोक्त करिती जगास | मार्गप्रभावना संतोष । भव्यजीवास वत्सलत्वं ॥ ११८ ॥ ऐसे जानोनी ज्ञानवंत । हीनाधिकाक्षर अर्थानर्थं । पुराणपठन अक्षरार्थं । आत्महितार्थ गुरूमुखे || ११९ ॥ श्लोक :- स श्रीमान् धरसेन नाम सुगुरू: श्रीजैन सिद्धान्ततो । सद्वादीदुर्व पुष्पदंतसुमुनिः श्रीभूतपूर्वो बलिः । एते सन्मुनयो जगत्त्रयहिताः सर्वामरैरचिताः । कुर्युर्मे जिनधर्मकर्मणि मतिं स्वर्गापवर्गप्रदे ॥ १२०॥
1
॥ कथा ९६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org