________________
प्रसंग शेहेचाळीसावा : ६२५
राज्य दिधले पूत्रासी । आपन गेले अरण्यासी । विनंती केली स्वामिसी । दीक्षा भारासी घेतले त्वरे ।।८८।। तीव्र तीव्र तप करोन । केले परत्राचे साधन । अनुक्रमे मोक्षगमन । तत् पदस्थान कवि मागे ।।८९।। असो श्रोता गुणवंत । आळस न करावा अक्षरार्थ । जेन होय पुण्या अनर्थ । व्यंजन अक्षरहीनार्थ नसो ।।९।। श्लोक:-इत्थ श्रीजिनभाषितं शुभतरं ज्ञात्वा सुशास्त्रं बुधैः । त्यक्त्वा मोहविधायकं भयहरं वेधा प्रमादं सदा । धर्मे कर्मणि शर्मकोटिजनके संज्ञानदानादिके । भक्त्या श्री जिनपूजने शुभतरे कार्या मतिः श्रेयसे ।।९१।।
॥ कथा ९५॥ कथा जाल्या पंच्यान्नव । पुढे श्रोता व्हावे सावध । जिनभाषित ज्ञान पाहावे । हीनाधिकार पाहे मनी ।।९२॥ श्लोकः-नत्वा जिनं जगत्पूज्यं केवलज्ञानलोचनं । हीनाधिकाक्षराख्यानं प्रवक्षे भव्यरंजनं ॥१३॥ सोरटदेशात विख्यात । श्री उजंतगीरी उन्नत । गिरनेर नाम असे त्यात । श्रीमत् चंद्रगुफेत मुनी ।।१४।। श्रीधरसेन महाचार्य । जैनतत्त्वाब्धि ज्ञानवर । चारित्राब्धि परीषहधीर । द्विविध क्रिया उपदेशी ।।१५।। जानोनिया अल्पजीवित । निमित्तशास्त्र पाहे गणित । विद्या साध्य नोव्हे त्यात । चिंताग्रस्त चित्तात जाहला ॥९६॥ तत् समीप आंध्र देसे । तत् बेनातट नग्न असे । संघ आले जिनयात्रेस । त्यात ज्ञानी असे महाचार्य ।।१७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org