________________
६२४ : आराधना-कथाकोष
तदा पत्र वाचिता पंडित । अथं न कळे कवनात । एक होता कुज्ञानवंत । अपमत्त अर्थ लाविला ॥७६।। म्हणे मागे पुढे अक्षर । बस्त ऐसा अर्थ चतुर । बकरे मेळउनि सहस्र । केले तय्यार बोकड ते ॥७७।। चारापानी त्यासी घालोन । बहुत रक्षिले यत्न करोन । व्यंजन अक्षरा केली हान । गुरूविना ज्ञानगर्विष्ट ते ॥७८।। तेव्हा तो राजा आगमनेसी । येता जाला स्वग्रामपुरासी। कार्य पुसे कारभायासी । दावा आम्हासी स्तंभ सर्वही ।।७९। राजा वदे करा तय्यारी । स्तंभ पाहीन आपुले नेत्री । ते म्हणती आनितो सामोरी । बैसावे कचेरी क्षणैक ।।८।। राजा म्हणे काय वदती । पाहू यासी काय अनिती। तव ते सहस्र बस्तहाकिती । वदनी वदती तीरदुस्स ॥८१॥ तेव्हा राजा क्रोधभरित । धरा मारा त्यासी वदत । तेव्हा ते काकुलति येत । लिहीले युक्त राया पत्री ।।८२।। नृप वदे पत्रासी दावा । वाचकासी त्वरे बोलावा । तयाच्या फेडीन मी ठावा । सूर्यपुत्र गावा धाडीन ।।८३।। वाचक म्हणे मी अज्ञान । व्यंजन अक्षर अर्थहीन । मज न कळे शास्त्रज्ञान । आळस प्रमादेन अर्थ केला ।।८४।। रे रे मूर्खा तू मिथ्यामती । पुण्यहानी अपेशप्राप्ती। दंड करोनी तयाप्रती । विचारी चित्ती पुण्यमार्ग ।।८५।। बोलाउनीया कारागर । स्तंभ करोनी सहस्र । तयार केले जिनमंदिर । रत्नाकार जिनबिंब ते ॥८६॥ संघे पूजाप्रतिष्ठा विधी । पुण्य मेळवी नवनिधी । कीर्ती जाहाली जगामधी। उत्पन्न बुद्धी वैराग्याची ॥८७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org