SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 647
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६२२ : आराधना-कथाकोष गर्ग उपाध्या नित्य जेवी । म्हणे याचि काय वो चवि । पुत्र म्हणे उगाच जेवी । आज्ञा पाळावी राजियाची ॥५५।। भोजन करी संकोचित । काया कृश मलीन दिसत । तत् राय जितून वैरियात । आले अयोध्येत राजेश्री ।।५६।। भेट जाली सर्व लोकासी । क्षेमकुशल पुसे त्यासी। राया तत् पुण्य सर्वत्रासि । खुशाल क्षेमेसी असो देवा ॥५७।। गर्ग उपाध्या पाहून राया । गहिवर दाटला तत् हृदया । कृश झाली मलीन काया । शब्दमुखे त्या न बोलवे ।।५८।। नृपे पाहोनी तयासी । दया आली हृदयासी । धरोनी स्वकीय पोटसी । समजावी त्यासी दयावंत ॥५९।। पाहोनिया कृश शरीर । काळिमा चढली अंगावर । म्हणे काय व्याधी सांगा त्वरे । करीन निर्जर औषधान ॥६०।। राया तुमचे आज्ञेप्रमान । नित्य कोळशाचे भोजन । तेन काया जाली मलीन । तुमचे पुण्यान वाचलो मी ॥६१।। ऐसे ऐकताची समग्र । रायासी कळला विचार । हृदयी क्रोधाग्निसंचार । कर्म दुर्धर अनुचित पै ॥६२।। स्त्रीपुत्रासी बोलाउनी । पुसे राजेंद्र क्रोधाग्नि । तव ते बोले गुणशालिनी । वाचक गुणी दर्शविला ॥६३॥ राय क्रोधे करून त्यासी । मुंडन केले अर्धमीसी। खरारोहण पश्चिमेसी । दंड तयासी दिधला ॥६४।। एवं अन्य न करावे । जिनभाषित मनी धरावे । शुद्धाक्षर अर्थ वदावे । मनी धरावे गुरूचे ज्ञान ॥६५।। For Private & Personal Use Only Jain Education International www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy