________________
प्रसंग शेहेचाळीसावा । ६२१ श्लोक :-सर्वकल्याणकेषुष्पचिताः त्रिदशादिभिः । नत्वा जिनेश्वरान् वक्षे अर्थहीनकथानकं ।।४३।। विनीता देश तो विस्तीर्ण । त्यात पुर नगर जान । साकेता नगरी विस्तीर्ण । द्वादशयोजन अयोध्या ।।४४।। तेथील राजा वसुपाळ । वसुमती स्त्री गुणमाळ । तत् पुत्र जाला सकुमाळ । वसुमित्र नामाभिधान ॥४५॥ तयाचा उपाध्या गर्गाचार्य । तर्क व्याकरण ज्ञानवर्य । राजा वसुपाळ धीर वीर । सर्व ऐश्वर्य राज्य करी ॥४६॥ तथा अवंती देशामाझारी । उज्जयनी नाम असेस नगरी । वीरदत्त राजा राज्य करी । वीरदत्ता आंतुरी वल्लभा ।।४७।। वीरदत्त तो राज्यधर । वसुपाळा न दे करभार । मानभंग तो जोरावर । करोन नगर बळकावी ॥४८।। वसुपाळ भूपती सैन्यासी । वेष्टिता जाला उजनीसी । वस्य करोन सर्वदेशासी । तो त्या ग्रामासी गुंतला पै ॥४९।। स्वनगरा पत्र पाठवोन । पुत्रा करवावे विद्यापठन । गर्गाचार्यासी बोलउन । नित्य भोजन उपाध्यासी ।५०।। श्लोक : पुत्रोऽध्यापयितव्योऽसौ वसुमित्रोऽति सादरं। शालिभक्तं मसिपृक्तं सर्पियुक्तं दिन प्रति ॥५१॥ पत्र लिहिल संस्कृत । राजस्त्रीय वसुमतीत । पुत्र सुमित्र त्यास युक्त । पत्र वाचीत पाठक ज्ञानी ।।५२।। त्यान सांगितला अर्थ । भोजन घालावे गर्गात । कोळसे घालोनी भातात । घृत यथास्थित पुष्कळ ।।५३।। मषि अर्थ न समजला । साखर कोळसा अर्थ केला । अनर्थ झाला अर्थाला । दोष लागला वाचकासी ॥५४॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org