________________
६१८ : आराधना-कथाकोष देवा कर्माधीन केल मात । शरण जाऊ मी कवनातं । चंद्रकीर्ती विनवी तुम्हात । कर्मबंधात छेदि बापा वो ।।८।। येथोनी कथा अनुसंधान । सकळी तयाचे असे वर्णन । शेवट अधिकार संपूर्ण । देवकृपेन होय सर्व ।।९।। श्लोक-यस्य सत्केवलज्ञाने भाति विश्वमणूपमं । तं जिनेंद्र प्रणम्योच्चेरनिह्नवकथं ब्रुवे ।।१०।। अवंती देश उज्जनी नन । राजा धृतीसेन चतुर । राणी मलयावती सुंदर । चंडपुत्र गुणोज्वल तो ।।११।। पूर्वपुण्य सर्वसुखी । दक्षिणदेशी बेनातटाखी । ब्राह्मण तेथे वसे सुखी । पुत्रसुखी काळसंजिव ।।१२।। सर्व विद्या संपूर्ण । उज्जनी नग्रासी जावोन । चंड प्रद्योत जितिला ज्ञान । दीक्षा उत्पन्न उभयतासी ।।१३।। विहारकरिता पृथ्वीवर । विपुलाचली महावीर । श्रेणिक राजा बंदी त्वर । उपदेश समग्र ऐकिला ।।१४।। समवशरणाबाहेरी । श्वेत संदिव मुनी तपश्री। श्रेणिक त्यात विचारी । गुरूनाम उच्चारी स्वामिया ।।१५।। तो म्हणे गुरू वर्धमान । नाम चोरील गुरूच त्यान । अनिह्नव दोष दारुण । सर्वांगान कुष्टी जाहला ।।१६।। पाहोन त्या आचार्यासी । श्रेणिक पुसे गौतमासी । गणधर सांगे रायासी । सूचना त्यासी करा वेगी ।।१७।। श्लोक : शीघ्रं पश्चात् समागते तत् समीप महीभुजा । श्रेणिकेन शुभवाक्यर्भत्या संबोधितः स च ॥१८।। श्रेणिक म्हणे गुरूवर्या । गुरू नाम लोप केला त्वया । कुष्ट व्यापला सर्व हृदया । अणिन्हव क्रिया दुःखदायी ।।१९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org