________________
५९४ : आराधना कथाकोष
कथा जाल्या संपूर्ण अशी । भव्य जन मन संतोषी। चित्त द्यावे अग्रकथेसी । अज्ञानासी सांभाळावे ॥१३९।। श्लोक-सारलक्ष्मीप्रदं नत्वा जिनेंद्र मुक्तीनायकं । वक्षे श्रीजयसेनस्य, भूपतेः सत् कथानकं ।।१४९।। श्रावस्ती नगरीचा राजा । जयसेन पाळक प्रजा । वीरसेना तयाची भाजा । पुत्र राजा वीरसेन पै ।।१४१।। राजगुरू बौध कुमती । शिवगुप्ताख्य मांस भक्षिती । राजा कंटाळा धरी चित्ती । मिथ्यामती बौद्ध दुष्टात्मा ॥१४२॥ एकदा तया नगरीसी । मुनीराज आले संघेसी । वृषभ मुनींद्र गुणराशी । ते रायासी श्रुत्य जाले पै ।।१४३।। राजा भव्यसंघ सहित । वंदना केली त्रिःपरीत्य । पादपूजा यथास्थित । पुण्यप्राप्त धर्मवृद्धी ।।१४४॥ धर्मामृत श्रवण केले । राया श्रावक व्रत घेतले । श्रावक सर्व संतोषले । विधान केले जिनगृही ॥१४५।। तदा जीर्णोद्धार नूतन । सर्व देशात धर्म स्थापोन । नित्य नेम देवदर्शन । कीर्ती संपूर्ण धर्मवृद्धी ।।१४६।। तदा तो बौद्ध मत पापी । वैरभावे तो सीघ्रकोपी । शिवगुप्त नामकुतपी । मंत्र तंत्र अी कुविद्या ।।१४७।। सम्यक्त्व बळे न चाले काही । मंत्र तंत्र तो इलाज नाही । मारेकरी घालिता तेही । न चाले काही उपाव ।।१४८।। मग तो गेला पथ्वीनगरा । सुमताख्ये सीष बरा । त्यासी सांगे धर्मसारा । टाक्रिलाधराज जयसेनान ।।१४९।। तेव्हा सुमतीरायान । पत्रिका पाठविली त्यान । कुळधर्म तुम्ही न सोडण । बौद्धगुरू चरण धरा ।।१५०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org