________________
प्रसंग चौरेचाळिसावा
ॐ नमः सिद्धेभ्यः ।
ॐ नमो पंच परम गुरू । अरिहंत सिद्ध मुक्तीवरू । आचार्य ज्ञानदाता तारु । ग्रंथाधारू पाठक साधू ॥१।। माय सारजा जिनवाणी । बाळकाच साह्यकारिनी। हृदयी जिह्वाग्री वसोनी । कवित्व करणी तूच तू ।।२।। दीक्षा शिक्षा सद्गुरूराये। ग्रंथाची दाखविली सोये । परि मी अज्ञानी मूढ होय । करावे साह्य जनकापरी ॥३।। मज न कळे संस्कृतार्थ । देशभाषा हे पराकृत । गुरूनी निरोपिले माते । करावे कवित बाळभाषा ।।४।। स्वामी गेले मोक्षमार्गान। ग्रंथ खंडित पाहिला नैन । गुरू आज्ञा हृदयी धरोन । तत् प्रसादेन कथाकोश ।।५।। श्रोते ज्ञाननिधी गंभीर । श्रवण करा गंगानीर । क्षीराब्धि अथाक मधुर । लावावा कर ज्ञानकृपेन ।।६।। मागील अध्यायाची कथा । तप आराधना पंच कथा । विद्युत्चर गुरूदेवदत्ता । चिलाईता मोक्ष सौख्यात ।।७।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org