________________
प्रसंग एक्केचाळीसावा । ५४९
पूर्व पुण्य भोगिती भोग । शुकपक्षीपूर्व प्रसंग | द्यूत खेळे तो राणीसंग | मणरंगण रंजवीतु ॥ १११ ॥ श्रीदत्तराय एके दिनी । ते देखिली दूतरमणी ।
मीच एक रमण रमणी । दुजा रमणी रमवी नष्ट ।। ११२ ।। रायामनी क्रोध उत्पन्न । पक्षी धरिला केले बंधन | तत् ग्रीवा टाकिली खंडोन । वैर बंधन जीव करी ।। ११३ ।। विषय अंतरी वैर धरी । आप सुख परपीडा करी । वैर चालली भवांतरी । न जाने अंतरी कुबुधी ॥ ११४ ॥ यक्षी मृत्य व्यंतर जाला । महाकष्टे वैर बांधला । तेथीच सुख भोगी भला । कर्म झोला जन्म जीवासी ।। ११५ । । श्रीदत्त तो एके दिवसी । उपरी वरी पाहे दिसी । देखिले अभ्रपटलासी । विरक्त मानसी जाहला ।। ११६ । । अहो संसार अभ्र समता । विघटे क्षण न लागता । काया जीवात्मा तो आतौता । विद्युल्लतासमान भासे ।। ११७ ।। भोगभुजंग तो विखारी । दंश काया येती लहरी | हा कष्टं चौन्यांशी माझारी । फिरे फेरी मूढजीव हा ॥ ११८ ॥ इत्यादी विचार करोन । चित्ती भावना भावोन । संसारकुडाहा दुर्जन । दीक्षा घेण आत्महितासी ।।११९ ।। निग्रंथ गुरूसी नमस्कार । दीक्षा घेतली सुखकार । होउनिया तो दिगंबर । एकविहार तीर्थवासी ।। १२० ।। देशांतरा फिरत फिरत आला तो जन्मभूमी जेथ । बहिर्भूमी शीतकाळात । उपवनात कायोत्सर्गी ।। १२१ ।। शुक पक्षी व्यंतर देव । तो पूर्व वैराचे प्रभाव । जानोनिया तो दुष्टभाव । करी उपद्रव ऋषीसी ।।१२२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org