________________
५१४ । आराधना-कथाकोष श्लोक:-सश्रीकेवळलोचनोऽतिचतुरो भव्यौघनिस्तारको। देवेंद्रादिसमचितो हितकरो धीरो मृगादिध्वजः ॥ नानाशर्मयशः प्रबोधजनको भक्त्या समाराधितो। दद्यात् मे भवतां च निवृत्तिपदं नित्यं महामंगलं ॥१९॥
इति मृगध्वज कथा श्लोक:-नमस्कृत्य जिनाधीशं संसाराबोधितारणं । श्वेतरामस्य संवच्मि, चरित्नं चित्तकारणं ॥२०॥ अयोध्या नगरील राजा । कीर्तिवीर्य कीर्तिची ध्वजा । पद्मावती गुणज्ञ भाजा । प्रीत वोजा प्राणवल्लभ ॥२१॥ नगरप्रदेशी अरण्यात । तापसी राहती गुंफेत । रेणुका कामिनी स्वनाथ । जमदग्नि तेथे तपाचरती ॥२२॥ तयासी पुत्र प्रथम जाला । स्वेतराम नाम त्याला । महेंद्रराम द्वितीय भला । प्रियंकर जाला सर्वासी ॥२३॥ एकदा रेणुकेचा बंधु । समीपवस्ती ज्ञानसिंधु । वरदत्त नामे प्रबोधु । वृक्ष आधुकाळ कर्मिती ॥२४॥ तेथे रेणुका प्रीति करोन । बंधुसी म्हणे सांगा पुराण । मग तो म्हणे सावधान । चित्त देवोन ऐकावे बाई ॥२५॥ जैनधर्म सर्वासी श्रेष्ठ । सम्यक्त्व व्रत घ्यावे स्पष्ट । जीवदया पाळावी सुभट । सर्व कष्ट ते दूर होती ॥२६॥ धर्म भवसागरी जहाज । जीवा उतरी तो सहज । मोक्षमार्गाच हेच बीज । देव गुरूराज ओळखावा ॥२७॥ देव तो जाना अरिहंत । अष्टादश दोषारहित । गुरू जानावा तो निग्रंथ । हिंसाविरहित तो धर्म ॥२८॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org